superfoods for women these foods you really need to stay healthy and strong try it once nrvb

पुरुषांच्या तुलनेत महिलांना पोटाच्या तक्रारींना अधिक प्रमाणात तोंड द्यावे लागते. पोटाचा अल्सर आणि योनीमार्गात होणारा संसर्ग कमी करण्यात दही सहाय्यभूत ठरते. याशिवाय, दह्यात हाडांना मजबूत करण्यासाठीचं कॅल्शियमही असतं. हे कोणत्याही वयाच्या महिलांसाठी आवश्यक आहे.' महिलांनी दररोज नाश्ता, दुपारचं जोवण किंवा स्नॅक्समध्ये एक कप दही खाणं मस्ट आहे.

शरीरासाठी एक संतुलित आहार नितांत आवश्यक आहे. महिलांना पीरियड्स, प्रेग्‍नन्सी आणि मेनोपॉज सारख्या गोष्टींतून जावं लागतं. या दरम्यान शरीरात अनेक प्रकारचे हार्मोनल बदल होत असतात. म्हणूनच पुरुषांच्या तुलनेत महिलांना अधिक पोषणाची गरज असते. महिलांसाठी काही पदार्थ हे सुपरफूड मानले जातात आणि त्यांनी या पदार्थांचा त्यांच्या आहारात समावेश करायलाच हवा.

लो फॅट दही :

महिलांनी आपल्या आहारात लो फॅट योगर्ट नक्कीच समाविष्ट करायला हवं. Age-proof Your Body पुस्तकाच्या लेखिका आणि आहारतज्ज्ञ एलिझाबेथ सोमर यांनी WebMD ला दिलेल्या माहितीनुसार, ‘दही ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करते. हे सप्रमाण सिद्धही झालं आहे की, पोटाशी संबंधित सगळ्या समस्या याने दूर होतात.

पुरुषांच्या तुलनेत महिलांना पोटाच्या तक्रारींना अधिक प्रमाणात तोंड द्यावे लागते. पोटाचा अल्सर आणि योनीमार्गात होणारा संसर्ग कमी करण्यात दही सहाय्यभूत ठरते. याशिवाय, दह्यात हाडांना मजबूत करण्यासाठीचं कॅल्शियमही असतं. हे कोणत्याही वयाच्या महिलांसाठी आवश्यक आहे.’ महिलांनी दररोज नाश्ता, दुपारचं जोवण किंवा स्नॅक्समध्ये एक कप दही खाणं मस्ट आहे.

फॅटी फिश :

महिलांनी त्यांच्या आहारात सेल्मन, सार्डिन आणि मॅकेरल माशांचा त्यांच्या आहारात समावेश करायला हवा. या माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड असतं. यात इकोसापेंटेनोइक एसिड ( EPA ) आणि डोकोसाहेक्सैनोइक एसिड ( DHA ) अधिक प्रमाणात असतं. फॅटी फिश हृदयाच्या समस्या, स्ट्रोक, हायपरटेन्शन, डिप्रेशन, हाडांची दुखणी आणि जळजळ (इंफ्लेमेशन) शी संबंधित समस्या दूर होतात. याशिवाय यापासून अल्जाइमरचाही बचाव होतो. आठवड्यात २-३ वेळा फॅटी फिश जरुर खावेत.

बीन्स :

बीन्समध्ये फॅट कमी आणि प्रोटीन व फायबरचा हा एक चांगला स्त्रोत मानला जातो. यामुळे हृदयाशी संबंधित तक्रारी आणि ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होतो. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ क्रूस यांच्यामते, बीन्स महिलांमध्ये हार्मोन्स स्थिर ठेवण्यास मदत करते. क्रूस म्हणतात की, बीन्स महिलांसाठी सर्वात आरोग्यदायी गोष्ट आहे. इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॅन्सरमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार संशोधकांना असं आढळून आलं आहे की, बीन्स ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करतात. बीन्स फक्त कोलेस्ट्रॉलच कमी करत नाही तर पेरिमेनोपॉज किंवा मेनोपॉजमध्ये बदलणाऱ्या हार्मोन्सना स्थिर ठेवण्यात मदत करतात.

लो फॅट दूध किंवा ऑरेंज ज्यूस :

लो फॅट मिल्क किंवा ऑरेंज ज्यूस मध्ये असणारं विटामिन D कॅल्शियम आतून शोषून घेण्यास हाडांना मदत करतो. विटामिन D शरीराला ऑस्टियोपोरोसिसपासून वाचविण्यास मदत करतो आणि मधुमेह, मल्टीपल स्केलेरोसिस आणि ब्रेस्ट, पोट आणि ओव्हरीच्या ट्युमरचा असलेला धोका कमी करतो. अधिकाधिक महिलांमध्ये विटामिन D ची कमतरता असते. दूध आणि ऑरेंज ज्यूस व्यतिरिक्त फॅटी फिशही याचा चांगला स्त्रोत आहे.

टोमॅटो :

टोमॅटोमध्ये आढळणारे लायकोपीनला पोषक तत्त्वांचे पावरहाऊस म्हटले जाते. संशोधनानुसार, लायकोपीनमुळे ब्रेस्ट कॅन्सरपासून बचाव होतो आणि हा मजबूत अँटिऑक्सिडंटही आहे जे महिलांच्या हृदयाशी संबंधित समस्यांशी लढण्यास मदत करते. अलीकडेच केलेल्या एका अभ्यासात दावा केलाय की, टोमॅटोमध्ये असणाऱ्या लायकोपीनमुळे वय वाढलं तरी ते दिसून येत नाही.

बेरीज :

ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, रास्पबेरी और क्रॅनबेरी यात एंथोसायन सारखी मजबूत अँटी-कॅन्सर पोषक तत्त्वे असतात. संशोधनानुसार महिलांमध्ये ब्रेस्ट आणि पोटाच्या कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते. या बेरीजमध्ये विटामीन सी आणि फोलिक ॲसिडही मोठ्या प्रमाणात असते जे प्रेग्नन्सीमध्ये महिलांसाठी नितांत आवश्यक असते. याशिवाय यात अँटी-एजिंग तत्त्वेही आढळतात. बेरीजमुळे महिलांच्या युरीनरी ट्रॅक्ट इंन्फेक्शनच्या समस्याही कमी होतात.