tabin reyaz from anantnag kashmir has become a sensation for his motivational writing vb
१३ वर्षांचा काश्मिरी 'चेतन भगत' लिहितोय अशा कथा ; वाचणारा प्रत्येक जण झालाय फिदा

त्याची कथा Overconfidence- the giant killer सोशल मीडियावर भरपूर शेअर होत आहे. ताबिन एक पुस्तक लिहित आहे जे येत्या काही महिन्यातच आकाराला येणार आहे. कमी वयात अशा प्रकारचा प्रयत्न केल्याबद्दल त्याच्या कुटुंबियांनाही त्याचा अभिमान वाटत आहे.

काश्मीरमधील एक १३ वर्षांचा तरुण आपल्या कथालोखनामुळे सर्वांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. तो छोट्या छोट्या कथा, लेख आणि अशा लघुकथा लिहितो की, त्याला आसपासच्या परिसरातील मोठमोठ्या लेखकांचीही दाद मिळत असून त्याच्या भागातील लोकांचीही वाहवा मिळत आहे. आपल्या जीवनसंघर्षाची व्यथा ज्या पद्धतीने त्याने मांडली आहे ती प्रत्येकाला भावली आहे. एवढ्या कमी वयात प्रेरणादायी लिखाणच त्याच्या या पसंतीचे प्रमुख कारण ठरले आहे.

७वी इयत्तेत असलेल्या ताबिन रेयाज़ दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातला राहणारा असून त्याला लिखाणाची आवड आहे. अनंतनागच्या ऐशमुकम परिसरातल्या हसन-नूर गावातील रहिवाशी रेयाज़ अहमद भट यांचा मुलगा ताबिनला लेखक व्हायचं असून तो आतापासूनच इतरांना प्रेरणादायी ठरतील अशा कथा लिहिण्यात त्याचा हातखंडा आहे. तो जीवनसंघर्षावरील कथा लिहिण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याची कथा Overconfidence- the giant killer सोशल मीडियावर भरपूर शेअर होत आहे. ताबिन एक पुस्तक लिहित आहे जे येत्या काही महिन्यातच आकाराला येणार आहे. कमी वयात अशा प्रकारचा प्रयत्न केल्याबद्दल त्याच्या कुटुंबियांनाही त्याचा अभिमान वाटत आहे.

लहानपणापासूनच त्याला सामान्यज्ञानाची आवड होती आणि त्याच्या आसपास घडणाऱ्या महत्त्वाच्या घटनांची तो नोंद करून ठेवत होता. त्याला लेखक व्हायचं आहे. आपला देश आणि काश्मीरला नावलौकिक प्राप्त करून द्यायचा आहे असं एका एजन्सीला सांगितलं आहे. त्याच्या छोट्या-छोट्या प्रेरणादायक कथा आई-बाबा, विद्यार्थी आणि शिक्षक या सर्वांसाठीच आहेत. गेल्या एका आठवड्यात त्याने २५ लेख आणि आठ ते नऊ लघुकथा हातावेगळ्या केल्या आहेत असं त्याने सांगितलं.

ताबिन मध्ये एक यशस्वी व्यक्ती होण्याची क्षमता असून मी नेहमीच त्याच्यासोबत आहे असं त्याचे बाबा रेयाज अहमद मानतात. एका दूरच्या छोट्याशा ग्रामीण भागात एखाद्या मुलाने महत्त्वाकांक्षा असणं ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे म्हणूनच त्यांना ताबिनचा अभिमान आहे असं ते म्हणतात. ताबिनने आयुष्यात त्याला जे हवं आहे त्याने ते करावं अशी त्याच्या बाबांची इच्छा आहे.