३ कोटीचे सोने घालतो हा साधू; परिसरात आहे चर्चेचा विषय

प्रयागराज. येथे अर्ध कुंभमध्ये स्नान करण्यासाठी हजारो साधू येतात . नागा बाबा आणि जुना आखाडाच्या साधुंनी वातावरण प्रफुल्लीत होते. बाबाच्या बोटात अंगठ्या, गळ्यात सोन्याचे लॉकेट, आणि हातात २७ लाखांचे डायमंडचे घड्याळ होते. बाबांनी  ३ कोटीचे  सोने घातल्याचे त्यांच्या भक्तांनी सांगितले.

‘जसे सोने अतिशय मौल्यवान असते, तसेच आमचे बाबाही आमच्यासाठी अमूल्य आहेत’, असे सांगत बाबांचे भक्तगण त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांचे एकप्रकारे समर्थन करतात.

सुधीर कुमार मक्कड असे या साधुचे नाव आहे. ५३ वर्षांचे सुधीर दिल्लीत कपड्यांचे व्यापारी होते. नंतर त्यांनी संन्यास घेतला. एक बिजनेसमॅन म्हणून मी अनेक चुका केल्या. याचे प्रायश्चित करण्यासाठी मी सन्यास घेतला. आता मी सर्व वेळ गरिबांची मदत करतो असे हा साधू म्हणाला.