प्रदूषित शहरात राहणाऱ्या महिलांच्या जीवाला धोका, हार्टफेलची शक्यता ४३ टक्क्यांनी वाढली

डेन्मार्क येथील युनिव्हर्सिटी ऑफ कोपेनहेगन (University of Copenhagen in Denmark) यांच्या सामाजिक स्वास्थ्य विभागातर्फे (Department of Social Health) केल्या गेलेल्या या अभ्यासाचा निष्कर्ष जर्नल ऑफ द अमेरिकन हार्ट असोसिएशनमध्ये (Journal of the American Heart Association) प्रकाशित करण्यात आला आहे.

    मुंबई : वाढत्या प्रदुषणामुळे (Increase Pollution) आपल्या आरोग्यावर अनुचित (affected health) परिणाम होतो, हे तर आपणा सर्वांना माहिती आहेच. मात्र नुकत्याच झालेल्या संशोधनात धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रदूषित शहरांमध्ये राहणाऱ्या महिलांच्या जीवाला सर्वाधिक धोका आहे (The lives of women living in polluted cities are most at risk). या महिलांचे हार्ट फेल (heart failure)  होण्याची शक्यता सर्वाधिक असल्याचे या अभ्यासात समोर आले आहे.

    या नव्या अभ्यासानुसार केवळ तीन वर्ष एखाद्या प्रदूषित शहरात राहिल्यास, महिलांमधील हार्ट फेलची शक्यता ४३ टक्क्यांनी जास्त असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. याबरोबरच डिमेंशिया, वांझपणा आणि वजन वाढण्यासारख्या इतर शारिरिक व्याधीही यामुळे जडण्याची शक्यता आहे. हे सर्व आजारही प्रदुषणाशी जोडले गेल्याचा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे.

    डेन्मार्क येथील युनिव्हर्सिटी ऑफ कोपेनहेगन (University of Copenhagen in Denmark) यांच्या सामाजिक स्वास्थ्य विभागातर्फे (Department of Social Health) केल्या गेलेल्या या अभ्यासाचा निष्कर्ष जर्नल ऑफ द अमेरिकन हार्ट असोसिएशनमध्ये (Journal of the American Heart Association) प्रकाशित करण्यात आला आहे.

    डेन्मार्क येथील महिलांबाबत १५ ते २० वर्षे हा अभ्यास करण्यात आला. पेट्रोल आणि डिजेलमधून निघणाऱ्या प्रदुषित कणांत वाढ झाली आहे. यामुळे महिलांमधील हार्टफेलचे प्रमाण १७ टक्क्यांनी वाढल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे, तसेच नायट्रोजन डाय ऑक्साईडच्या वाढीमुळे हा धोका १० टक्क्यांनी वाढला आहे.