ही ५ पुस्तके आहेत बिल गेट्स यांच्या सर्वाधिक आवडीची; यशस्वी व्हायचे असल्यास नक्की वाचा

  जगातल्या यशस्वी लोकांची यादी करायची झाल्यास सर्वात पहिले नाव जर कुठले येत असेल तर ते आहे  मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत बिल गेट्स यांचे.   त्यांच्या यशामागे अनेक रहस्ये आहेत (the secrect of bill gets success). या रहस्यामधील एक रहस्य म्हणजे पुस्तके. त्यांच्या यशामागे अशीही काही पुस्तके आहेत जी वाचल्यावर आयुष्याचा धडा मिळतो. अशा काही पुस्तकांचा त्यांनी वेळोवेळी नोट्समध्ये उल्लेख केला आहे. ते म्हणतात की या पुस्तकांच्या आत अशा अनेक गोष्टी आहेत ज्या कोणालाही यशस्वी व्यक्ती बनवू शकतात.

  बिल गेट्स कायम नवीन आणि चांगली पुस्तके वाचल्यानंतर आपला अनुभव शेअर करत असतात. आज आम्ही त्यांच्या आवडीच्या 5 पुस्तकांविषयी माहिती देणार आहोत.

  The Ride of a Lifetime : याचे लेखक बॉब इगर आहेत. बिल गेट्स यांच्या नोट्सनुसार एखाद्या मोठ्या कंपनीच्या सीईओमध्ये कोणत्या क्वालिटीज असल्या पाहिजेत ते या पुस्तकात चांगल्या पद्धतीने सांगण्यात आले आहे. यात त्यांनी आपल्या Disney प्रवासाचा उल्लेखही केला आहे.

  Where Good Ideas Come From : या पुस्तकाचे लेखक स्टीव्हन जॉन्सन आहेत, त्यानुसार यशस्वी होण्यासाठी नाविन्यपूर्णता असणे गरजेचे आहे. बिल गेट्स यांच्या म्हणण्यानुसार व्यवसाय किंवा शिक्षण क्षेत्रात जे लोक आहेत त्यांच्यासाठी हे खूप पुस्तक खास आहे.  The Choice :
  या पुस्तकाचे लेखक डॉ एडिथ अवा ईगर आहेत. बिल गेट्सच्या म्हणण्यानुसार, कोविड 19 साथीच्या अडचणीच्या काळात हे पुस्तक वाचल्याने धैर्य मिळेल आणि अडचणींना सामोरे जायला मदत होईल.

  Good Economics for Hard Times : अभिजित व्ही. बॅनर्जी आणि एस्तेर डुफलो ( Esther Duflo ) यांनी हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक अमेरिकेसारख्या श्रीमंत देशांमधील इमिग्रेशन, असमानता आणि राजकारणाबद्दल आर्थिक दृष्टिकोनातून सांगते.

  Cloud Atlas : डेव्हिड मिशेल यांनी ही कादंबरी लिहिली आहे. हजारो वर्षांत बदलणाऱ्या आणि न बदलणार्‍या गोष्टींचा उल्लेख आहे असल्याचे बिल गेट्स यांनी म्हटले आहे. तसेच यात मानवी मूल्यांबद्दलसुध्दा माहिती दिली आहे.