बिअर प्यायल्याने शरीराला होतात असेही फायदे; वाचून तुम्हालाही किक बसली नाहीतर नवलच

तथापि अधिक प्रमाणात बिअर पिणंआरोग्यासाठी लाभदायक ठरतच नाही. पण असंही नाही की, यामुळे काही नुकसान होतं अनेक संशोधनात बिअरच्या काही अशा फायद्यांच्या बाबत दावे केले आहेत, ज्यामुळे तुम्ही चकीत व्हाल. चला तर मग जाणून घेऊयात बिअर पिण्याचे काय काय फायदे आहेत.

  आजच्या मॉडर्न लाइफमध्ये बिअर पिणं एक सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. बिअरशिवाय पार्टी आणि फंक्शन जणूकाही अपूर्णच असल्यासारखं आहे. बिअर पिणं आरोग्यासाठी योग्य नाही असं काहीजण मानतात, कारण त्यांना वाटतं की, बिअरचे सेवन केल्याने लिव्हर खराब होतो.

  तथापि अधिक प्रमाणात बिअर पिणं आरोग्यासाठी लाभदायक ठरतच नाही. पण असंही नाही की, यामुळे काही नुकसान होतं अनेक संशोधनात बिअरच्या काही अशा फायद्यांच्या बाबत दावे केले आहेत, ज्यामुळे तुम्ही चकीत व्हाल. चला तर मग जाणून घेऊयात बिअर पिण्याचे काय काय फायदे आहेत.

  • तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही लिमिटमध्ये बिअर प्यायलात, तर यापासून हृदयरोगाशी संबंधित समस्यांपासून बचाव करण्यात तुमची मदत करते.
  • असं म्हणतात की, बिअरमध्ये उत्तम प्रमाणात कोलेस्ट्रॉल असतं. याशिवाय यात विटामिन -B6, विटामिन-B, फॉलिक ॲसिड आणि अनेक चरबीयुक्त विरघळणारे घटक असतात, जे तुमच्या आरोग्याला अतिशय फायदेशीर ठरु शकतात. यासाठी बिअर आवश्य प्या पण, एका लिमिटपर्यंतच.
  • संशोधनानुसार, बिअरमध्ये सिलिकॉन नामक तत्व आढळते. जे हाडं मजबूत करण्यासाठी मदत करते. एका संशोधनात असंही आढळून आलं आहे की, जे लोक कधी-कधी बिअरचे सेवन करतात, त्यांची हाडं अपेक्षेपेक्षा अधिक मजबूत असतात.
  • एका संशोधनानुसार, बिअर प्यायल्याने स्मरणशक्ती चांगली होते. ही Xanthohumol नावाच्या संज्ञानात्मक कार्याची दुरुस्ती करण्याचे काम करते.
  • असं म्हणतात की, झोप न येण्याची समस्या असेल तर बिअर पिऊ नका. ही तुमचं झोपेचं चक्र बिघडवू शकते, जे आपल्या आरोग्यासाठी नक्कीच चांगलं नाही.
  • जर तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असेल, तर कोणत्याही प्रकारचे मद्य पिण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या, विशेषत: रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी या सल्ल्याचे आवर्जून पालन करावे.
  • एक्सपर्ट्स सांगतात की, बिअर प्यायल्याने किडनी स्टोन्स तयार होण्याची शक्यता कमी होते. ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’नुसार बिअक प्यायल्याने हृद्यविकाराचा झटका येण्याचे प्रमाण कमी होते.