चष्मा लावून-लावून नाकावर व्रण पडले आहेत?असे करा दूर, जाणून घ्या घरगुती उपाय आणि व्हा निश्चिंत

नाकावर पडलेले चष्म्याचे व्रण घालविण्यासाठी मध (honey) अत्यंत गुणकारी आहे. यासाठी मध घेऊन व्रण पडलेल्या ठिकाणी दिवसातून २ ते ३ वेळा हलक्या हातांनी मालिश करा. त्यानंतर ती जागा पाण्याने स्वच्छ धुवा. एक आठवडा लगातार याचा वापर केल्यास व्रण आपोआप कमी होतील.

  आज प्रत्येक वयोगटातील लोकांना चष्मा लागला असल्याचे आपण पाहतो. अशातच सातत्याने चष्मा लावून-लावून नाकाच्या त्वचेवर दाब पडतो. जेव्हा चष्मा काढतो तेव्हा त्वचेवर दाब पडल्याने होणाऱ्या व्रणामुळे चेहरा खराब दिसू लागतो. अशातच काही घरगुती उपायांचा अवलंब करून यापासून आपल्याला सुटका करता येते. जाणून घेऊया हे व्रण दूर करण्याचे घरगुती उपाय…

  • एक चमचा लिंबाच्या (lemon) रसात एक चमचा पाणी मिसळून कापसाच्या बोळ्याच्या मदतीने चष्म्यामुळे झालेल्या व्रणाच्या ठिकाणी लावा. हा रस १५ मिनिटे तसाच राहू द्या त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा. दररोज या उपायाचा अवलंब केल्यास काही दिवसातच हे व्रण नाहीसे होतील.
  • नाकावर पडलेले चष्म्याचे व्रण घालविण्यासाठी मध (honey) अत्यंत गुणकारी आहे. यासाठी मध घेऊन व्रण पडलेल्या ठिकाणी दिवसातून २ ते ३ वेळा हलक्या हातांनी मालिश करा. त्यानंतर ती जागा पाण्याने स्वच्छ धुवा. एक आठवडा लगातार याचा वापर केल्यास व्रण आपोआप कमी होतील.
  • कोरफड (Aloe Vera Gel) जेल घेऊन नाकावर व्रण पडलेल्या ठिकाणी हलक्या हातांनी ५ मिनिटे मालिश करा. त्यानंतर गरम पाण्याने हा भाग स्वच्छ करा. हा प्रयोग काही दिवस सातत्याने केल्यास हे व्रण लवकर दूर होण्यास मदत होईल.
  • काकडीच्या तुकड्यांचा (Cucumber) चेहऱ्यावरील डाग घालविण्यासाठी उपयोग करता येतो. नाकावर ज्या ठिकाणी व्रण पडले आहेत त्या ठिकाणी काकडीचा तुकडा घेऊन घासा असं केल्याने लवकर हे व्रण साफ होतील.
  • टोमॅटो कापून एक स्लाइस नाकावर ज्या ठिकाणी व्रण आहेत त्या ठिकाणी घासा. आपल्याला हवं असेल तर मिक्समध्ये घालून याची पेस्ट तयार करू शकता. हे ५ मिनटे लावून ठेवा आणि त्यानंतर पाण्याने स्वच्छ करा. काही दिवस सातत्याने हा उपाय केल्यास हळूहळू हे व्रण निघून जातील.