‘या’ सुंदर स्त्रियांमुळे इतिहासात घडली होती भयंकर महायुद्ध

त्यामध्ये मग महाभारताची लढाई असो किंवा रामायण युद्ध  ही महायुद्धही याला अपवाद नाहीत. 

  असे म्हणतात की, सौंदर्य हे बघणाऱ्याच्या नजरेवर अवलंबून असते. त्यामुळे जो प्रत्येक गोष्टीकडे चांगल्या नजरेने बघतो त्याला जगातल्या सगळ्याच गोष्टी चांगल्या दिसतात. स्त्रियांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास प्रत्येक स्त्रीचे सौंदर्य हे तीच्या वेगवेगळ्या गोष्टीत असते.

  यामध्ये कुणाचे डोळे तर स्मितहास्य हे सुंदर असते. तर कुणाचे केस सुंदर असतात . कारण स्त्रीच्या सौंदर्याचेही निरागसता, सोज्वळता, नाजूकपणा, मादकता असे अनेक प्रकार अनेक गोष्टी पुरुषांना खूप आकर्षित करत असतात. इतिहासात असा अनेक स्त्रियांचा उल्लेख आहे की यांच्या सुंदरतेमुळे बरीच मोठी युद्ध घडली आहेत. त्यामध्ये मग महाभारताची लढाई असो किंवा रामायण युद्ध  ही महायुद्धही याला अपवाद नाहीत.

   

  १. रानी पद्मिनी:- राणी पद्मिनी इतिहासातील सर्वात सुंदर तसेच एक सर्वश्रेष्ठ स्त्री योध्दा म्हणून यांना ओळखली जाते. राणी पद्मिनी या चित्तौरच्या राणी होत्या. असे म्हणतात की आलाउद्दिन खिलजीने पूर्ण चित्तौर राज्य या राणीला मिळवण्यासाठी नष्ट केले होते. खरं तर, जेव्हा खिलजीची भारताच्या राजवटीवर सत्ता होती, तेव्हा खिलजीला राणी पद्मिनीच्या सौंदर्याने वेडे केले होते. त्यामुळे खिलजीने चित्तोडला तब्बल 8 महिने विळखा घातला होता.

  पण राणी पद्मिनीने त्याला शरण गेली नाही, यावर राणी पद्मिनीने आपली पतिव्रता आणि धाडसाने खिलजी सारख्या राक्षसाचा सामना केला.

  २. जोधा बाई:- जोधा एका हिंदू राजाची मुलगी होती आणि तसेच तिच्या सौंदर्याची चर्चा संपूर्ण भारतभर होत असत, असे सांगितले जाते. पण त्यावेळी भारतावर अकबर राज्य करत होता. काही इतिहासकारांचे म्हणण्यानुसार , अकबरने जोधा बाईला एका यात्रेत पाहिले होते आणि तिच्या सौंदर्याने राज्याला भुरळ घातली. त्यानंतर अकबरने जोधाबाईला मिळविण्यासाठी आमेर या राज्यावर युद्धाचा इशारा दिला तेव्हा आपले राज्य वाचवण्यासाठी जोधाबाईच्या वडिलांनी अकबरशी तिचे लग्न लावून दिले.

  ३. शहजादी फिरोजा:- शहजादी फिरोजाचे नाव इतिहासात जरी एवढे प्रसिद्ध नसले तरी यादेखील आपल्या काळातील एक अतिशय सुंदर राजकन्या मानल्या जात होत्या. शहजादी फिरोजा ही आलाउद्दिन खिलजीची मुलगी असल्याचे सांगितले जाते.

  तसेच ती जालोरच्य कान्हडदेवच्या प्रेमात पडली होती,  पण ही गोष्ट खिलजीला समजताच त्याने जालोरबरोबर युद्ध करुन राजा कान्हडदेवला ठार मारले आणि शहजादी फिरोजा यांची प्रेमकहाणी अपूर्ण राहिली. असे म्हणतात की ,शहजादी फिरोजा या राजकन्येने याचा बदला घेतला होता.