झपाट्याने कमी होत चालली आहे ‘या’ प्राण्याची प्रजाती; पृथ्वीवर अनादी काळापासून आहे अस्तित्व

कळपात एक पुढारी प्रौढ नर, माद्या, लहान मोठी पिले आणि निरनिराळ्या वयांचे नर असतात. शिकाऱ्याच्या टेहळणीचे काम माद्या करतात. जिराफ भित्रा, गरीब, शांत व निरुपद्रवी आहे. स्वत:च्या संरक्षणासाठी जिराफ शत्रूला पायांनी जबरदस्त फटकारे मारतो. पण जिराफ नरांच्या होणाऱ्या झुंजीत ते डोके आणि मान यांचाच उपयोग जास्त करतात.

    सगळ्यात उंच आणि लांब मानेचा प्राणी म्हणजे जिराफ. पिवळा रंग, त्यावर काळे ठिपके आणि लांब मान यामुळे जिराफ सगळ्यांनाच आकर्षित करतो. जिराफ हा जिराफिडी कुलातील प्राणी असून त्याचे अवशेष ग्रीस, दक्षिण रशिया, आशिया, मायनर, भारत, चीन आणि आफ्रिकेत आढळले आहेत; यावरून पुरातन काळी हा सर्व पृथ्वीवर आढळत होता, असे म्हणता येईल.

    – हल्ली मात्र तो फक्त आफ्रिकेत सहाराच्या दक्षिण भागात दिसून येतो. ‘झरापा’ या अरबी शब्दापासून जिराफ हा शब्द तयार झाला आहे.  याच्या कित्येक प्रजाती असून त्यांना नुवियन जिराफ, केप जिराफ, सोमाली जिराफ इत्यादी नावे मिळाली आहेत. जिराफ गवताळ रानात राहतो. त्यांचे 12-15 जणांचा कळप असतो. कधीकधी 70 जिराफांचा मोठा कळप असतो.

    – कळपात एक पुढारी प्रौढ नर, माद्या, लहान मोठी पिले आणि निरनिराळ्या वयांचे नर असतात. शिकाऱ्याच्या टेहळणीचे काम माद्या करतात. जिराफ भित्रा, गरीब, शांत व निरुपद्रवी आहे. स्वत:च्या संरक्षणासाठी जिराफ शत्रूला पायांनी जबरदस्त फटकारे मारतो. पण जिराफ नरांच्या होणाऱ्या झुंजीत ते डोके आणि मान यांचाच उपयोग जास्त करतात.  जिराफ उभा राहूनच झोप घेतो. पाणी पिताना किंवा जमिनीवरील भक्ष्य खाताना मान जमिनीपर्यंत पोहोचावी म्हणून जिराफांना पुढचे पाय फाकवावे किंवा गुडघ्यात वाकवावे लागतात.

    – जिराफ सकाळ व संध्याकाळ अशा दोन्ही वेळी चरतात आणि दुपारी विश्रांती घेतात. जिराफ रवंथ करणारे प्राणी आहेत. ओकेशिया (बाभळीच्या वंशातील), जंगली जरदाळू वगैरे झाडांची पाने ते खातात, उंच मानेमुळे पाणी पिताना मात्र जिराफाला थोडासा त्रास सहन करावा लागतो. पण पाण्याशिवाय ते महिनाभरसुद्धा राहू शकतात. जिराफाला आवाज काढता येत नाही अशी समजूत आहे, पण तो कण्हल्यासारखा किंवा ‘बेंबें’ असा बारीक आवाज काढतो.

    – जिराफाची डोक्यासहित धडाची लांबी चार मीटर, शेपटीची 86 सेंमी, खांद्यापाशी उंची तीन-चार मीटर, वजन 550 ते 1,800 किलो इतके असते. जिराफाचा सर्वसाधारण रंग पिवळसर असतो. त्यावर काळसर तांबूस रंगाचे, विविध आकारांचे व आकारमानांचे ठिपके (चकदळे) असतात. खालची बाजू फिक्कट रंगाची असून तिच्यावर ठिपके नसतात. जिराफाची मान खूप लांब असून नराच्या मानेवर ताठ उभ्या केसांची आयाळ असते. त्याला छोटी छोटी दोन शिंगेही असतात, पण ती डोक्यावरच्या केसांमध्ये लपल्यामुळे दिसून येत नाहीत. या शिंगांमध्ये हाडे नसतात. त्यांची लांबी 10-15 सेंमी असते.