राशी भविष्य दि. २७ डिसेंबर २०२०; ‘या’ राशीला महिला वर्गाचा सल्ला उपयोग ठरेल; जाणून घ्या तुम्हाला काय होणार फायदा

मेष : कष्टानुसार यश मिळाल्यामुळे आनंद होईल . रचनात्मक कार्यात आवड वाढेल. कौटुंबिक जीवन आशादायी व प्रगतीशील असेल. पाहुण्यांचा सत्कार होईल.

वृषभ : प्रभावशाली लोकांच्या संपर्कामुळे लाभ मिळेल. व्यापार वाढेल. कार्यात व्यस्त राहाल, जोडीदाराचे सहकार्य मिळेल.

मिथुन : तुम्ही ज्यास तोट्याचा सौदा समजत होते, त्यात चांगला लाभ मिळेल. उच्च शिक्षणावर विचार होईल. अधिक कष्ट होतील. मानसन्मान व प्रतिष्ठा मिळेल.

कर्क : कोर्टकचेरीच्या कार्यात यश मिळेल. जुने कार्य केल्यामुळे प्रसन्नता राहील. वाद टळणे हिताचे राहील.

सिंह : भावनांवर नियंत्रण ठेवा. लोक मजाक उडवतील. कौटुंबिक प्रकरणात सर्वाचा सल्ला लाभदायी राहील, प्रलंबित कार्यात यश मिळेल.

कन्या : सकारात्मक विचाराने प्रकरणे सुटतील. मित्रांचे सहकार्य राहील. भावनांवर नियंत्रण ठेवा. नवीन योजनांचा विस्तार होऊ शकतो.

तूळ : वैयक्तिक कार्य टळल्यामुळे समस्या वाढू शकते. खासगी संबंधांमध्ये सुरू असलेला ताण दूर होईल. काही आवश्यक कामे होतील. लाभ मिळेल.

वृश्चिक : अपेक्षेपेक्षा अधिक खर्च होईल. नियमिततेकडे लक्ष द्या. एखाद्याशी व्यर्थ वादविवाद करू नका. अधिक श्रम होतील.

धनु : राजकीय क्षेत्रात पदप्रतिष्ठा वाढेल .मंगलकार्यामध्ये खर्च होईल, नवीन योजनांची सुरुवात होईल. सुखसुविधा राहतील.

मकर : नोकरीसंबंधी कार्यात सफलता मिळेल. वेळ पाहून कार्य करा. पुरुषार्थ राहील. कामकाज होण्याचे योग आहेत.

कुंभ : प्रयत्न केल्यास सफलता मिळेल. राजकीय कार्य होईल. लांबपल्ल्याच्या प्रवासाची शक्यता आहे, अनावश्यक खर्च टाळा,

मीन : नवीन मित्र होतील. महिलावर्गाचा सल्ला उपयोगी राहील. मानसिक स्थिरता राहील. जमीन-मालमततेच्या प्रकरणांमध्ये सफलता मिळेल .