पुरुष आणि स्त्रियांना वेगवेगळ्या वेळी होते Sex ची इच्छा; मात्र वेळ चुकल्यास…

सेक्स करण्याची वेळ बदलल्याने सेक्स लाईफ (Sex Life) सुधारते का? हे सांगणारं महत्त्वपूर्ण संशोधन (Research) झालेलं आहे. सेक्सपर्ट किंवा सेक्शुअल वेलनेस तज्ज्ञांचा काय सल्ला आहे जाणून घ्या...

  • आपला जोडीदार सेक्समध्ये इंट्रेस्टेड नसेल किंवा सेक्स लाईफ खराब झालं असेल तर त्याची कारणं पडताळून पहा. सेक्स करण्याच्या वेळेचाही सेक्स लाईफवर परिणाम होत असतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते लैंगिक संबंधांसाठीही ठराविक वेळ असते.
  • बरेच कपल्स रात्रीच्या वेळी सेक्स करतात. पण, प्रेमसंबंधासाठी ही वेळ चुकीची ठरु शकते. फ्रंटियर्स इन सायकोलॉजी या जर्नलमधील २०१८च्या अभ्यासानुसार पुरुष आणि स्त्रियांमध्ये वेगवेगळ्या वेळेला लैंगिक इच्छा वाढतात.
  • या अभ्यासानुसार लैंगिक संबंधांसाठी कोणतीही ठराविक वेळ नसते.पण, संध्याकाळी स्त्रियांची लैंगिक इच्छा सर्वाधिक असते, तर पुरुष सकाळी सर्वात उत्साही असतात. बहुतेक जोडपी रात्री ९ वाजल्यापासून मध्यरात्रीच्या काळात सेक्स करतात.

  • कपल्स आपल्या डेली रुटीननुसार सेक्स करतात तेच लैंगिकदृष्ट्या समाधानी असतात असं संशोधन सांगतं. ‘द पॉवर ऑफ व्हेन’चे लेखक मायकेल ब्रुस हे सांगतात की,’झोपेच्या वेळी लैंगिक संबंध ठेवणं वाईट नसतं. पण यावेळी दिवसभराच्या कामांमुळे थकवा आलेला असतो. त्यामुळे उत्साह वाटत नाही’
  • अमेरिकेच्या रिलेशनशिप आणि सेक्स थेरपिस्ट लिसा थॉमस सांगतात,प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगळी असते. रात्री लैंगिक संबंध काहींसाठी पूर्णपणे थकवणारं असतात. तर, कांहीना टेन्शन कमी करून शरीराला रिलॅक्स करतात. काही लोकांना लैंगिक संबंधानंतर खूप चांगली झोप लागते.
  • काम संपल्यानंतर रात्री एकत्र झोपल्याने शारीरिक संबंध सुधारतात. झोपेत शरीर हार्मोन्स बनवण्याचं काम करतं आणि सकाळी शरीर संपूर्ण शक्तीने जागं होतं. त्यामुळे सकाळी सेक्स केला तर त्यातून मिळणारं समाधान जास्त असतं.

  • नोकरी आणि कामामुळे दोघांचं शेड्युल वेगवेगळं असल्यामुळे प्रत्येक जोडप्यासाठी सकाळी सेक्स शक्य नाही. म्हणूनच सेक्स टाइमिंगबद्दल अधिक जागृकता असावी.
  • डॉ. थॉमस यांच्या मते दुपारीही सेक्स करा येतो. त्यासाठी जोडीदाराने लैंगिक जीवन सुधारण्यासाठी वेळ काढला पाहिजे. जे कपल्स टेन्शन कमी करण्यासाठी सेक्स करतात. त्या जोडप्यांचं लैंगिक आयुष्य जास्त काळ चांगलं राहतं.

  this is the worst time of day for intimacy know about sexual health in details