मुली ‘या’ गोष्टी नेहमी ठेवतात सिक्रेट!

अनेकांच्या मते मुलींना समजून घेणे ही पराकाष्टाची गोष्ट आहे, पण वास्तविक पाहता ही काही इतकी कठीण गोष्ट नाही. मुली त्यांच्या मनात अनेक गोष्टी साठवून ठेवतात. प्रामुख्याने काही  गोष्टींचा सुगावा तर  त्या कधीच दुसऱ्याला लागू देत नाहीत. म्हणूनच तुम्ही या गोष्टींबद्दल सजग राहणं आवश्यक आहे. जेणेकरून त्यांच्या भावना, विचार व गरजा या त्यांच्या जोडीदारापर्यंत पोहोचल्यास अनेक बाबतीत त्यांचं आयुष्य सुखकर होऊ शकेल.

 कालांतराने  का होईना मुली त्यांच्या मनातील भावना मोकळ्या करतात. मुली कणखर असल्या तरीही त्या भावनिक असतात. त्यामुळे मैत्री करतानादेखील जो मुलगा त्यांच्या समस्या समजू शकेल अशाच व्यक्तीची त्या घट्ट मित्र म्हणून निवड करतात.

मुली रिलेशिपमध्ये कितीही खूष असल्या तरीही त्या बॉयफ्रेंडसोबत त्यांच्या भूतकाळ, पूर्वायुष्याबद्दल बोलणं शक्यतो टाळतात. अनेकदा मुलींना भीती वाटते की पूर्वायुष्याबद्दल बोलण्यामुळे त्यांच्या वर्तमान नात्यावरही परिणाम होऊ शकतो.

मुली त्या करत असलेल्या बचतीबद्दल कधीच खुल्याने बोलत नाहीत.  त्या अशा गोष्टी अनेकदा लपवून ठेवतात. भविष्यात अशा पैशांचा योग्यरित्या वापर करता यावा याकरिता मुली बचतीबद्दल बोलणं टाळतात.

मुली त्यांच्या वैद्यकीय चाचण्या आणि उपचारांबद्दल बोलणं टाळातात. अनेकदा मुली एकाच वेळेस अनेक शारिरीक व  मानसिक पातळींवर समस्यांचा सामना करत असतात. कोणत्याही उपचारांबद्दल  मोकळेपणाने बोलणं त्यांच्या  नात्यावर गंभीर परिणाम करू शकतात या भीतीनेच त्या बोलणं टाळतात.