लग्नानंतर असे जपा नाते

लग्न (Marriage) हे एक असे नाते आहे जिथे एकाचवेळी नवीन अनेक नाती जोडली जातात. यात सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती सासू- सासऱ्यांची. आई- वडिलांची जागा अचानक सासू- सासरे घेतात. आयुष्याच्या अशा टप्प्यात नवीन आई- वडिलांना समजणे(understanding) अनेकदा कठीण होऊन जाते. मात्र वैवाहिक आयुष्य (married life) सुरळीत व्हावे असे वाटत असेल तर त्यांना समजून घेणे फार आवश्यक आहे. पती- पत्नीने मिळून संसाराचे निर्णय घेणे फार आवश्यक आहे. दोघांनी एकमेकांना समजून घेत लग्नानंतर जोडलेल्या प्रत्येक नात्याला न्याय देणे गरजेचे आहे.

लग्नानंतर पत्नी तिच्या आई- वडिलांना सोडून नवऱ्याच्या घरी येते, तेव्हा तिच्यासाठी सासू- सासरे फार महत्त्वाचे असतात. भलेही तुम्हाला त्यांची एखादी गोष्ट आवडली नाही किंवा त्यांना तुमची गोष्ट आवडली नाही तरी सर्वांना एकत्रच राहायचे असते. एखाद वेळेस तुमचे सासू- सासऱ्यांशी पटले नाही आणि तुमच्या मताशी नवरा सहमत नसेल तर दोघांनी मिळून त्यावर समाधान शोधले पाहिजे. काहीशा अशा प्रकारे तुम्ही समस्यांचे निरसन करू शकता. याबद्दल पत्नीशी मोकळेपणाने बोला. तिला आई – वडिलांबद्दल प्रत्येक छोटी- मोठी गोष्ट सांगा, जेणेकरून तिला पूर्ण कल्पना असेल. तसेच पत्नीला समजवा की हट्ट धरण्यात काहीच साध्य होणार नाही. प्रत्येक गोष्ट समजून घेण्याची गरज असते. तुम्ही तिला संयुक्त घराचे महत्त्व समजवा. तुमच्यासाठी आई- वडील किती महत्त्वाचे आहेत ते नक्की समजवा. तसेच तिला कोणतीही अडचण आली तरी संपूर्ण कुटुंब तिच्या पाठिशी ठामपणे उभे राहिल याचा विश्वास द्या. तुमच्या प्रत्येक संकटात आई- बाबांची साथ नक्की असेल. पत्नीला समजावून सांगा की, मुलांच्या योग्य संगोपनात वडिलधाऱ्यांची नजर असणे फार महत्त्वाचे आहे. यामुळे मुलांना चांगले संस्कार मिळतील.