smell from fridge

फ्रिजमधून वास (Fridge Odor)येऊ नये म्हणून काही सोप्या टिप्स तुम्ही वापरू शकता. त्या कोणत्या ते पाहूयात.

    फ्रिजमध्ये(Fridge) जास्त दिवस एखादी वस्तू पडून राहिली की वास यायला लागतो. अनेकदा काही पदार्थ झाकण न ठेवता फ्रीजमध्ये ठेवल्यानेही फ्रीजला वास येऊ लागतो. फ्रिजमधून वास (Fridge Odor)येऊ नये म्हणून काही सोप्या टिप्स तुम्ही वापरू शकता. त्या कोणत्या ते पाहूयात.

    • सोडा – जर फ्रीजमधून सारखा वास येत असेल तर एका वाडग्यात बेकिंग सोडा ठेऊन तो वाडगा फ्रिजमध्ये ठेवा.
    • लिंबू- लिंबामधील आंबट गंध फ्रिजमधील वास सहजपणे काढण्यास मदत करतो. लिंबाचा अर्धा भाग कापून फ्रिजमध्ये ठेवा.
    • पुदीना अर्क – पुदीन्यामध्ये गंध कमी करण्याची क्षमता असते. फ्रीजमध्ये एका भांड्यात पुदीना ठेवू शकता किंवा फ्रीज साफ करताना अर्क वापरू शकता. काहीजण फ्रिजसाठी संत्रा अर्कसुद्धा वापरतात.
    • कॉफी बीन्स – कॉफी बीन्स खूप स्ट्राँग असतात. कॉफी फ्रिजमध्ये ठेवल्यानेही फ्रिजमधील दुर्गंधी कमी होते.