कोरोनातून बरं झाल्यावर भेडसावते आहे गंधाची(वासाची) समस्या; ज्यांनी गमावली आहे ही क्षमता अशांना दिला जातोय गुलाब, लॅव्हेंडर आणि मिंटचा वास, तज्ज्ञ या सेन्सला ॲक्टिव्ह करण्याचे देत आहेत प्रशिक्षण

उपचारांपुढे हात टेकल्यानंतर साहिलच्या पालकांनी अशा व्यक्तीची मदत घेतली, ज्याच्याकडे इलाजाची संभावना नसल्यासारखीच होती. साहिलचे बाबा प्रतिक शाह म्हणतात, परिचितांच्या सांगण्यावरून त्यांनी न्यूयॉर्कच्या एक फ्रेगरन्स एक्सपर्ट सू फिलिप्स यांच्याशी संपर्क साधला.

  तेरा वर्षांचा साहिल शाह गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कोरोनाबाधित झाला होता. यानंतर त्याला कोणत्याही प्रकारचा गंध किंवा वास येणं बंदच झालं होतं. त्याच्या पालकांनी त्याची ही समस्या दूर करण्यासाठी न्युरोलॉजिस्ट, न्युरोसर्जन आणि नाक, कान घसा तज्ज्ञांसहित अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला. काही महिन्यांपर्यंत साहिल असाच हैराण होत राहिला पण त्याची ही समस्या जैसे थेच होती.

  उपचारांपुढे हात टेकल्यानंतर साहिलच्या पालकांनी अशा व्यक्तीची मदत घेतली, ज्याच्याकडे इलाजाची संभावना नसल्यासारखीच होती. साहिलचे बाबा प्रतिक शाह म्हणतात, परिचितांच्या सांगण्यावरून त्यांनी न्यूयॉर्कच्या एक फ्रेगरन्स एक्सपर्ट सू फिलिप्स यांच्याशी संपर्क साधला. जेव्हा शाह परिवार फिलिप्स यांच्या मॅनहटन स्थित बुटीकमध्ये पोहोचले तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं की, त्या काही डॉक्टर, वैज्ञानिक किंवा केमिस्ट नाहीत, म्हणून त्या साहिलला बरं करू शकतील असं त्या ठामपणे सांगू शकत नव्हत्या.

  गंधाची क्षमता गमावलेल्या लोकांना बरं करण्यासाठी फिलिप्सने १८ प्रकारचे कस्टमाइज्ड फ्लेवर तयार केले आहेत. उपचारांची सुरुवात त्या हलका सुगंध जसे गुलाब, लॅव्हेंडर आणि मिंट याने करतात. फिलिप्स सांगतात की, एका वेळी एकाच गंधाची बाटली देण्यात येते. त्या लोकांना सांगतात की, वास घेतल्यानंतर याचा अनुभव मेंदूतही घेता यायला हवा. अनेकजण अगदी सुरुवातीच्याच टप्प्यात बरे होतात. त्यांच्या गंध अनुभवण्याच्या क्षमतेत खूपच फरक पडल्याचे दिसून येते.

  प्रतीक म्हणतात, त्यांच्या मुलात २५%सुधारणा झाली आहे. काही नसण्यापेक्षा काहीतरी असणं हे अधिक चांगलं असल्याचं त्यांचं मत आहे. हार्वर्ड विद्यापीठातील न्युरोवैज्ञानिक व्यंकटेश मूर्ती यांच्या मते, काही गंध आठवणी आणि भावनांना प्रेरित करू शकतात, वास्तिक पाहता फिलिप्सही असंच काहीतरी करत आहेत.

  वेगवेगळ्या सुगंधांचा वापर करून एखाद्या व्यक्तीची वास घेण्याची क्षमता पुनर्संचयित केली जाऊ शकते. या प्रक्रियेत कोणत्याच प्रकारचं नुकसान नाही. जर्नल ऑफ क्लिनिकल इम्युनोलॉजी मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात विशेषज्ञांनी दावा केला होता की, या प्रक्रियेने वास घेण्याची क्षमता पुनर्संचयित होण्यास मदत होऊ शकते.

  बेल्जियममध्ये दोन वेगवेगळ्या सुगंधांचा प्रयोग, सकारात्मक परिणाम

  ऐन लेरक्विन यांची केस वेगळी होती. कोरोना होण्याआधी त्या ज्या गंधाकडे आकर्षित होत होत्या, त्यांना तोच गंध नंतर दुर्गंध वाटू लागला. लेरक्विन यांच्यासारखे अनेक रुग्ण स्मेल प्रशिक्षण घेत आहेत. यात ते डोळे बंद करून दिवसातून दोन वेळा वेगवेगळा सुंगधाचा वास घेतात. उपचार करणाऱ्या डॉ. हुआर्ट म्हणतात ‘ध्यान लागणं गरजेचं आहे. कारण मेंदूत वास्तिक या सुगंधाच्या स्मृती प्रत्यक्षात यायला हव्यात. लेरक्विनची केस पाहता तिच्या मेंदूला पुन्हा हे शिकायला हवं की गुलाबाला गुलाबाचाच सुगंध येतोय की, दुर्गंध.

  to awaken the smell of experts giving training smell are healing those who have lost the ability to smell with the scent of rose lavender and mint