येथे प्रेत दफन करण्यासाठी घ्यावी लागते भाड्याची कबर; तीही मिळते फक्त १५ वर्षांसाठीच

सिंगापूरमध्ये मृत्यूनंतर लोकांना १५ वर्षांसाठी जमीन उपलब्ध होते. त्यानंतर मात्र त्यांचा मृतदेह कबरीच्या बाहेर काढला जातो. सिंगापूरचे क्षेत्रफळ अतिशय कमी आहे.

सिंगापूर. कोणत्याही देशात माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी प्रशासनाकडून मोफत सोय केलेली असते. अगदी थडगे किंवा कबर बांधण्यासाठीदेखील कोणत्याही प्रकारचे भाडे किंवा कर प्रशासन आकारत नाही. पण कोणी जर सांगितल की सिंगापूरमध्ये मात्र थडगे बांधायचे असेल तर भाडे द्यावे लागते, तर त्यावर तुमचा विश्वास बसणार आही. परंतु सिंगापूरमध्ये मृत्यूनंतर लोकांना १५ वर्षांसाठी जमीन उपलब्ध होते. त्यानंतर मात्र त्यांचा मृतदेह कबरीच्या बाहेर काढला जातो. सिंगापूरचे क्षेत्रफळ अतिशय कमी आहे.

त्यामुळेच जमीन ही या देशातील सर्वांत मोठी मालमत्ता आहे. त्यामुळेच १९९८ मध्ये सिंगापूर सरकारने एक कायदा करून कोणत्याही कुटुंबाला आपल्या नातेवाईकाचा मृतदेह दफन करण्यासाठी फक्त १५ वर्षांसाठी जमीन भाड्याने मिळू शकेल, अशी तरतूद केली आहे. जर मृतदेह योग्य पद्धतीने कुजला नाही तर सरकार त्यास आणखी दोन ते तीन वर्षांचा कालावधी देते. आता या थडग्यांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. ही थडगी सिमेंटची बांधण्यात येतात व त्यावर गवत आंथरले जाते. त्यामुळे एका मृतदेहाचा १५ वर्षांचा कालावधी संपला तर त्यात दुसरा मृतदेह दफन केला जातो.