पाणीपुरीत वेडिंग रिंग ठेवून केला प्रेमाचा इजहार ; अनोख्या प्रकारावर तिच्यासह नेटकरीही झाले फिदा

त्याच्या या प्रपोजची चर्चा आता सोशल मीडियावर देखील होत आहे. विशेष म्हणजे प्रपोज करण्याची त्याची स्टाईल सोशल मीडियावर अनेकांना आवडली देखील आहे. एका व्यक्तीने पाणीपुरीमध्ये वेडिंग रिंग ठेवत आपल्या प्रेयसीला प्रपोज करत प्रेम व्यक्त केले आहे. लोकांना ही कथा ऐकताच आनंद झाला.

    मुंबई : प्रेमात पडल्यावर लोक कधी काय करतील याचा नेम नाही. त्यातही एखाद्या व्यक्तीला प्रपोज करायचं म्हटल्यावर वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. तो प्रपोजचा दिवस यादगार होण्यासाठी काहीतरी भन्नाट करण्याचा प्रयत्न केला जातो. असाच हा प्रपोजचा दिवस संस्मरणीय करण्यासाठी एका प्रियकराने अनोखी शक्कल लढवत आपल्या प्रेयसीला प्रपोज केलं आहे.

    त्याच्या या प्रपोजची चर्चा आता सोशल मीडियावर देखील होत आहे. विशेष म्हणजे प्रपोज करण्याची त्याची स्टाईल सोशल मीडियावर अनेकांना आवडली देखील आहे. एका व्यक्तीने पाणीपुरीमध्ये वेडिंग रिंग ठेवत आपल्या प्रेयसीला प्रपोज करत प्रेम व्यक्त केले आहे. लोकांना ही कथा ऐकताच आनंद झाला. या कथेविषयी ऐकल्यानंतर सोशल मीडियावर एका युजर्सने लिहिले की, ज्याप्रकारे या व्यक्तीने त्याच्या प्रेयसीला प्रपोज केलं आहे, त्याची ही कल्पना आश्चर्यकारक आहे.

    या अनोख्या प्रपोजचे फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलेच धुमाकूळ घालत आहेत. त्या व्यक्तीची अनोखी स्टाईल सर्वांनाच आवडली आहे. हेच कारण आहे की, ही कथा ऐकून लोक मुलाचे कौतुक करत आहेत. अनेकांनी या अनोख्या प्रपोजचे फोटो सोशल मीडियावर शेअर देखील केले आहेत. लोकांनी या फोटोंवर मजेशीर कमेंट देखील केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने प्राणीसंग्रहालयात आपल्या मैत्रिणीला प्रपोज केलं होतं. त्यानंतर त्याचेही फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

    to propose his girlfriend a person put wedding ring in paani puri goes viral on social media