१९ जून दिनविशेष; अमेरिकेत कामगारांसाठी ८ तासांचा दिवस निश्चित करण्यात आला, जाणून घ्या आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य

    घटना.

    १६७६: शिवाजी महाराजांनी प्श्चात्त्पादग्ध सरनोबत नेताजी पालकर यांना विधीपूर्वक शुद्ध करून हिंदू धर्मात पुन्हा समाविष्ट केले.

    १८६२: अमेरिकेने गुलामगिरीची प्रथा बेकायदा जाहीर केली.

    १८६५: अमेरिकेतील गॅल्व्हेस्टन येथील गुलामांना मुक्ती. हा दिवस येथपासून जून्टीन्थ या नावाने साजरा केला जातो.

    १९१२: अमेरिकेत कामगारांसाठी ८ तासांचा दिवस निश्चित करण्यात आला.

    १९४९: चार्लोट मोटर स्पीडवे येथे पहिल्यांदा नासकारची स्पर्धा आयोजित केली गेली.

    १९६१: कुवेतला इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले.

    १९६६: शिवसेनेची स्थापना.

    १९७७: ट्रान्स अलास्कन पाइपलाइन मधुन आर्क्टिक प्रदेशातुन तेलवाहतुक सुरू झाली.

    १९७८: ईंग्लंडच्या इयान बोथम याने पाकिस्तान विरुद्ध लॉर्डसवर ८ बळी घेऊन शतक सुधा केले.

    १९७८: गारफील्डया कार्टून व्यक्तिमत्त्वाचे वर्तमानपत्रात पदार्पण.

    १९८१: भारताच्या ‘ॲपल’ उपग्रहाचे प्रक्षेपण.

    १९८९: ई. एस. वेंकटरामय्या यांनी भारताचे १९ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.

    १९९९: मैत्रेयी एक्स्प्रेस या कोलकाता ते ढाका बस सेवेचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी उद्‍घाटन केले.

    today is the 19th of june in history An 8 hour day has been set for workers in the United States Learn todays feature