१० जुलै दिनविशेष : आर्वी येथील विक्रम इनसॅट भू-केंद्र राष्ट्राला अर्पण केले, जाणून घ्या आजच्या दिवसाचे महत्त्व

  घटना.

  १८९०: वायोमिंग अमेरिकेचे ४४ वे राज्य बनले.

  १९१३: कॅलिफोर्नियातील डेथ व्हॅलीमध्ये तापमान १३४ अंश फूट (५७ अंश सेल्सिअस) पर्यंत वाढले, जे पृथ्वीवरील सर्वात उच्च तापमानाचे रेकॉर्ड आहे.

  १९२३: मुसोलिनी यांनी इटलीतील सर्व राजकीय पक्षांवर बंदी घातली.

  १९२५: अवतार मेहेरबाबा यांनी मौनव्रताची सुरुवात केली सलग ४४ वर्षे हे व्रत मृत्यूपर्यंत पाळले.

  १९२५: तास या सोव्हिएत संघाच्या वृत्तसंस्थेची स्थापना झाली.

  १९४०: बॅटल ऑफ ब्रिटन या नावाने ओळखले जाणारे हवाईयुद्ध सुरू झाले.

  १९४७: मुहम्मद अली जिना पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल झाले.

  १९६२: टेलस्टार-१ हा पहिला अमेरिकन दळणवळण उपग्रह प्रक्षेपित केला.

  १९७३: पाकिस्तानच्या संसदेने बांगलादेशला मान्यता दिली.

  १९७३: बहामाज देशाला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.

  १९७८: मुंबई येथे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाची स्थापना झाली.

  १९७८: मॉरिटानियात लष्करी उठाव झाला.

  १९९२: मादकद्रव्यांच्या तस्करीबद्दल पनामाचे माजी राष्ट्राध्यक्ष मॅन्युएल नोरिएगा यांना ३० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.

  १९९२: आर्वी येथील विक्रम इनसॅट भू-केंद्र राष्ट्राला अर्पण केले.

  १९९२: संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या इन्सॅट-२ए या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोउरू येथून प्रक्षेपण झाले.

  १९९५: म्यानमारमधील लोकशाही चळवळीच्या प्रणेत्या आंग सान सू क्यी यांची ६ वर्षांच्या नजरकैदेतून बिनशर्त मुक्तता करण्यात आली.

  २०००: मनुभाई मेहता पुरस्कार शास्त्रज्ञ वि. ग. भिडे यांना जाहीर.

  २०००: नायजेरियात एका फुटलेल्या तेलवाहिनीत स्फोट होऊन गळणारे तेल गोळा करण्यासाठी आलेले २५० जण जळून ठार झाले.

  today the day in history July 10 Special Day Vikram Insat Ground Center at Arvi Dedicated to the Nation the Importance of Today