आजचे राशी भविष्य दि. ३० ऑक्टोबर २०२०; मीन राशीला होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं भविष्य

मेष : नातेवाईक आणि जोडीदारांची चांगली साथ मिळेल. कार्यालयातून दिलेलं काम पूर्ण कराल. प्रवासाचा किंवा पर्यटनाचा योग दुपारनंतर निर्माण होईल.

वृषभ : आज तुमच्या स्वभावात क्रोध, राग दिसून येईल. आरोग्याची काळजी घ्या. धार्मिक यात्रा, प्रवास करण्याचा लवकरच योग निर्माण होईल. कार्यालयात वातावरण चांगले असेल.

मिथुन : बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना आजचा दिवस चांगला असेल. दिलेली जबाबदारी वेळेआधी पूर्ण करतील आणि वरिष्ठांची मनं जिंकतील.

कर्क : व्यावसायिक क्षेत्रात आज तुमच्या कार्याचं खूपच कौतुक होईल. कामात चांगले यश प्राप्त होईल. स्थावर संपत्ती वाढण्याचा योग निर्माण होईल. सरकारी कामे पूर्ण होतील. वैचारिक कारणांमुळे एखाद्या निश्चित निर्णयावर तुम्ही पोहोचू शकणार नाहीत.

सिंह : आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आजारपणामुळे पैसे अधिक खर्च होण्याची शक्यता आहे. वायफळ खर्च सुद्धा होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल.

कन्या : बाहेरील खाद्य-पदार्थ खाणं टाळा. आज मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी चालून येईल. व्यापाऱ्यांना मोठा लाभ होण्याची शक्यता आहे.

तूळ : मीडिया आणि आयटी क्षेत्रातील लोकांना यश मिळेल. धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे. दाम्पत्य जीवनात सुख प्राप्त होईल. आरोग्य चांगले राहील.

वृश्चिक : वैवाहिक आयुष्यात जोडीदाराची चांगली साथ मिळेल. कामात चांगले यश प्राप्त होईल. वायफळ खर्च टाळा. प्रवासाचा योग लवकरच निर्माण होईल.

धनु : भावनेच्या प्रवाहात वाहत जाऊन कुठलाही निर्णय घेऊ नका. एखाद्या व्यक्तीसोबत मोठा वाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. वाद-विवाद टाळा. कुटुंबियांसोबत वाद होण्याची शक्यता आहे.

मकर : आज धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. भाऊ तसेच इतर नातेवाईकांसोबत सुरू असलेल्या व्यवहारात चांगला लाभ होईल. कामाच्या व्यापामुळे ताण जाणवण्याची शक्यता आहे.

कुंभ : आज शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील. मन प्रसन्न असेल. विद्यार्थी अभ्यासात चांगली प्रगती करतील. साहित्य, कला क्षेत्रातील व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला असेल.

मीन : आज वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. जीभेवर ताबा ठेवा आणि वाद टाळण्याचा प्रयत्न करा. धनलाभ होण्याची शक्यता आहे. नव्या कामाची सुरूवात करण्यास आजचा दिवस चांगला आहे.