आनंदी सेक्स लाईफसाठी ‘स्त्री ‘जोडीदाराला असे घ्या समजून

सेक्स लाईफमध्ये येणाऱ्या अडचणींवर अनेकदा स्प्ष्टपणे बोलले जात नाही. विशेषतः स्त्री पार्टनरला जाणवणाऱ्या समस्याबद्दल स्पष्टपणे जाणून घेण्याऐवजी नकारात्मक बाबींवर अधिक चर्चा केली जाते.

  आनंदी जीवनासाठी सेक्स लाईफ फार महत्त्वाची आहे. मात्र सेक्स लाईफमध्ये येणाऱ्या अडचणींवर अनेकदा स्प्ष्टपणे बोलले जात नाही. विशेषतः स्त्री पार्टनरला जाणवणाऱ्या समस्याबद्दल स्पष्टपणे जाणून घेण्याऐवजी नकारात्मक बाबींवर अधिक चर्चा केली जाते. खालील काही मुद्द्यांच्या आधारे स्त्रीयांना जाणवणाऱ्या समस्या समजावून घेण्याचा प्रयत्न करु या. अनेकदा पत्नीला सेक्सची इच्छा होता नसल्याची तक्रार केली जाते. परंतु याची कारणेही जाणून घ्या. अन अंमलबजावणी करा.

  बऱ्याचदा स्त्रियांना सेक्समध्ये घाई अजिबात आवडत नाही. प्रत्यक्ष सेक्सपेक्षा foreplay आवडतो बहुतांश स्त्रियांना. प्रत्यक्ष सेक्सपेक्षा cuddling आवडतं.

  स्त्रीयांना जोडीदाराच्या तोंडाचा, अंगाचा जननेंद्रियांचा वास आवडत नसेल तर सेक्सबद्दल घृणा निर्माण होवू शकते, त्यामुळेस्वच्छतेची योग्यटी खबरदारी घ्या.

  जोडीदाराने जर तिच्या ऑर्गजमची काळजी न घेताच सगळं उरकलं, आणि असं वारंवार झालं तर तिचा इंटरेस्ट निघून जातो. कारण एकदा excite झाल्यानंतर, विना orgasm पुन्हा पूर्ववत होणे तिच्यासाठी अत्यंत कठीण असते. त्यामुळे पुरुषांनी तिच्या orgasm ची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे

  पुरुषांनी हे लक्षात ठेवा She is good in bed,when she is happy,comfortable,when she feels secure,confident about herself.

  स्त्रियांची कामेच्छा खूपशी त्यांच्या मनाशी जोडलेली असते हे खरे, त्यामुळे निरोगी काम जीवनासाठी तिचे मानसिक स्वास्थ सांभाळणे हे आवश्यक आहे. त्यासाठी तिच्या अपेक्षा पूर्ण करणे,तिला आवडेल असे वागणे,तिचे भावविश्व समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

  अभ्यासाच्या, करिअरच्या टेन्शनमुळे,कोणाला गर्भधारणेच्या भीतीमुळे,कोणाला पुरेशी प्रायव्हसी आणि वेळच नसल्यामुळे,कोणाला सेक्स दरम्यान वेदना होत असल्यामुळे सेक्सची इच्छा होत नाही .

  स्त्रीची नैसर्गिक कामेच्छा विशीपंचविशी पेक्षा पस्तीस ते पंचेचाळीस या वयात छान असते. त्याचं कारण कदाचित तेंव्हा आलेलं स्थैर्य,मुले मोठी झाल्याने स्वतःला वेळ देवू शकणे,आयुष्यात काहीतरी तरी अचिव्हमेंट केलेली असल्याने येणारा आत्मविश्वास हे असेल. यावेळी जोडीदाराने स्वतःला जास्त व्यस्त करून घेवून तिला योग्य तो वेळ दिला नाही तर तिची कुचंबणा होवू शकते.