Unnecessary quarrels, arguments, quarrels in the house? Give these life-changing tips a try and then see

अनेकदा घरात विनाकारणी कटकटी, वाद, भांडण होत असतात. सर्व सुविधा, पैसा, सुख असले तरी ते भोगायला देखील भाग्य लागते. सर्व व्यवस्थित असले तरी घरात कुणाशी कुणाचे पटत नाही, उगाचच्या वादावादी आणि संताप निर्माण होत असेल तर निराश न होता एकदा वास्तू नि‍गडित काही सोपे उपाय करून बघा.

  मुंबई :  अनेकदा घरात विनाकारणी कटकटी, वाद, भांडण होत असतात. सर्व सुविधा, पैसा, सुख असले तरी ते भोगायला देखील भाग्य लागते. सर्व व्यवस्थित असले तरी घरात कुणाशी कुणाचे पटत नाही, उगाचच्या वादावादी आणि संताप निर्माण होत असेल तर निराश न होता एकदा वास्तू नि‍गडित काही सोपे उपाय करून बघा.

  उपाय जे अगदी सोपे आणि सहजरित्या करता येतील. असे म्हणतात की सोपे उपाय केल्याने नात्यातील कडूपणा दूर होतो, नकरात्मकता दूर होते. तर जीवन सुखा- समाधानाने व्यतीत करायचे असेल तर एकदा हे उपाय अमलात आणून बघायला हरकत तर काय.

  • घरात आठवड्यातून एकदा लोभाणचा धूर करणे शुभ ठरते.
  • गव्हात नागकेशराचे 2 दाणे आणि तुळशीचे 11 पान टाकून गहू दळवणे देखील शुभ ठरते.
  • घरात मोहरीच्या तेलाच्या दिव्यात लवंग टाकणे देखील शुभ असते.
  • प्रत्येक गुरुवारी तुळशीच्या झाडाला दूध अर्पित करावे.
  • दररोज तव्यावर पोळी शेकण्यापूर्वी दूधाचे शिंतोडे मारणे शुभ ठरेल.
  • तसेच पहिली पोळी गायीसाठी काढून ठेवावी.
  • घरात 3 दारे एकाच रेषेत नसावे. आणि असं असल्यास एक दारं नेहमी बंद ठेवावे.
  • वाळलेले फुले देवघरात किंवा घरात देखील नसावे.
  • संत-महात्मा यांचे आशीर्वाद देत असलेले चित्र बैठकीत लावावे.
  • घरात तुटके- फुटके, अटाळा, फालतू वस्तू ठेवू नये.
  • दक्षिण-पूर्व दिशेच्या कोपऱ्यात हिरवळ दर्शवणारे चित्र लावावे.
  • घरातील नळ गळत नसावे.
  • घरात गोल कोपरे असलेलं फर्नीचर शुभ आहे.
  • घरात तुळशीचं झाडं पूर्व दिशेत गॅलरीत किंवा पूजा स्थळी ठेवावे.
  • वास्तुप्रमाणे उत्तर किंवा पूर्व दिशा पाणी काढण्यासाठी योग्य मानली गेली आहे. ही दिशा आर्थिक दृष्ट्या शुभ मानली गेली आहे.