Use Dabur Honey in sweets instead of sugar and celebrate healthy Diwali
साखरे ऐवजी मिठाईमध्ये वापरा ‘डाबर हनी’ आणि साजरी करा आरोग्यदायी दिवाळी

सध्याच्या करोनामय वातावरणामुळे सगळ्याच सण-उत्सवांवर सावट पडले आहे. अशावेळी दिवाळीसारखा सण आपल्याला मित्र-मंडळी आणि कुटूंबियांसोबत एकत्र आणतो. दिवे उजळवण्यापासून ते घर सजवण्यापर्यंत आणि फराळ बनवण्यापासून ते रोशणाई करण्यापर्यंत सगळी कामे एकत्रित करत आनंदाची उधळण एकमेकांवर यानिमित्ताने होत असते.

  • ‘डाबर हनी’ सोबत दिवाळी करा ‘गोड’

मुंबई : सध्याच्या करोनामय वातावरणामुळे सगळ्याच सण-उत्सवांवर सावट पडले आहे. अशावेळी दिवाळीसारखा सण आपल्याला मित्र-मंडळी आणि कुटूंबियांसोबत एकत्र आणतो. दिवे उजळवण्यापासून ते घर सजवण्यापर्यंत आणि फराळ बनवण्यापासून ते रोशणाई करण्यापर्यंत सगळी कामे एकत्रित करत आनंदाची उधळण एकमेकांवर यानिमित्ताने होत असते. अशा सगळ्या या आनंददायी वातावरणात डाबर इंडिया लि.च्यावतीने डाबर हनीमध्ये तयार करण्यात आलेले लज्जतदार, आरोग्यदायी मिष्टान्न बाजारात उपलब्ध झाले आहेत.

डाबर इंडिया लि.चे आरोग्यपोषक विभागाचे प्रमुख कुणाल शर्मा यांनी यावेळी सांगितले की, ’दरवर्षी उत्सवांचा उत्साह वाढवण्यामध्ये डाबर हनी अग्रणी असतो. याही वर्षी आम्ही दिवाळीमध्ये ग्राहकांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेत या दिवाळीमध्ये अभिनव संकल्पना घेऊन आलो आहोत. यावर्षी आम्ही मुंबईतील काही मिठाई आणि मिष्टान्न बनवणाऱ्या प्रसिध्द दुकानांसोबत भागीदारी केली असून त्यांच्या दुकानात यावर्षी बनणारे मिष्टान्न हे डाबर हनीमध्ये बनवलेले असणार आहे. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या दुकानांमध्ये मिळणारी मिठाई, मिष्टान्न हे आता डाबर हनीमुळे अधिक आरोग्यदायी आणि चवदार असणार आहे.’

मुंबईतील काही नावाजलेल्या दुकानदारांसोबत करण्यात आलेल्या डाबर हनीच्या या भागीदारीमध्ये ग्राहकांना प्रामुख्याने गाजरहलवा, गुलाबजामून, मोतीचूर लाडू, पेढे यांचा समावेश आहे. साखरेऐवजी यामध्ये वापरण्यात आलेल्या डाबर हनीमुळे ग्राहकांना मिठाई गोड तर लागेलच पण त्यासोबत त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेणारी असेल.

‘दिवाळीसारख्या सणावेळी साधारणत: आपण प्रमाणापेक्षा अधिक गोड पदार्थ खातो. अशावेळी अर्थातच आरोग्याकडे सहज दुर्लक्ष होते. त्यामुळे अशावेळीच आपण स्वत:ची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. आणि जे मिष्टान्न खाणार आहोत ते पुरेसे आरोग्यदायी आहे ना, हे पाहिले पाहिजे. त्यामुळे आपण घरी बनवत असलेल्या गोडधोड पदार्थांमध्ये किंवा बाजारातून आणत असलेल्या मिष्टान्नांमध्ये साखरेऐवजी हनीचा वापर करणे गरजेचे आहे. आणि हाच विचार घेऊन डाबर हनीने मुंबईतील मिठाई दुकानदारांसोबत ही महत्वपूर्ण आणि अर्थातच आरोग्यदायी भागीदारी केली असल्याचे डाबर आरोग्यपोषक विभागाचे प्रमुख कुणाल शर्मा यांनी पुढे नमूद केले.