uses of bhimseni camphor what are the benefits for health
भीमसेनी कापराचे असे आहेत फायदे, जाणून घ्या

 • कापराच्या सुगंधाने जिवाणू, विषाणू, लहान कीटक नष्ट होतात. त्यामुळे वातावरण शुद्ध राहते व आजार दूर राहतात.
 • सर्दीचा त्रास होत असल्यास 3-4 कापूर एकत्र करून ते हुंगल्यास त्याने थोडा आराम मिळतो.
 • कपाटात किंवा कपडे ठेवता अशा ठिकाणी कापूर ठेवावा. त्याने कपड्यांना कुबट वास येत नाही.
 • सर्दी, खोकल्याकरिता एका पातेल्यात गरम पाणी करून त्यामध्ये हा कापूर टाकावा आणि त्याची वाफ घ्यावी. आराम मिळतो.
 • तोंडाच्या दुर्गंधीसाठीही कापूर उपयुक्त मानला जातो. कापूर व्यवस्थित श्वासावाटे आत घेतल्याने तोंडाला घाण वास येत असल्यास निघून जातो.
 • मूठभर कापूर थोडासा तव्यावर तापवून ते एका रुमालात बांधून त्याचा शेक गळ्याला दिल्यास घसा बसला असेल तर बरा होतो.
 • घरात डास जास्त असल्यास रात्री आपल्या सभोवती कापूर ठेवा, डास फिरकत नाहीत.
 • कापूर अति जाळू नये. कारण अति धुराने डोळे झोंबतात, डोळ्यांना त्रास होऊ शकतो.
 • गरम पाण्यात मीठ व बराच कापूर टाकून त्यात पाय बुडवून ठेवल्याने आराम मिळतो.
 • तिळाच्या तेलात कापूर एकत्र करून ते तेल सांध्यांना लावावे. तिळाच्या तेलाच्या उग्र वासाचा त्रास होत नाही.
 • कापूर खोबरेल तेलात एकत्र करून ते तेल केसांच्या मुळाला लावावे. दुसऱया दिवशी केस स्वच्छ धुवावेत. कोंडा कमी होतो.
 • दाढ जास्त दुखत असल्यास कापराचा लहानसा खडा किडलेल्या दातात ठेवावा. तो आपोआप विरघळतो आणि आराम मिळतो. लाळ पोटात गेल्यास काही अपाय नाही.
 • कापराचा रोज तीन वेळा सुवास घेतल्याने आपल्या नाकाची वास ओळखायची क्षमता वाढते.