ही बातमी म्हणजेच एड्सला निमंत्रण : ‘या’ देशात चालकांना प्रवास भाडे देण्यापेक्षा मिळतेय सेक्सची ऑफर!

Sex instead of fare : प्रवास भाडे देण्याऐवजी चालकांना लैंगिक संबंध ठेवण्यासाठी महिला प्रवाशांकडून विचित्र ऑफर दिली जात आहे. यामुळे एचआयव्ही बाधितांची संख्या वाढण्याचा धोका आहे. एका अभ्यासातून ही धक्कादायक बाब समोर आली.

    कंपाला : युगांडामध्ये एचआयव्ही विरोधातील लढाईमध्ये युवकांच्या कृत्यामुळे मोठी अडचण येत असल्याचे म्हटले जात आहे. युगांडामध्ये मोटारसायकल कॅब चालकांची वर्तवणूक धोकादायक ठरत आहे. कॅबचा वापर करणाऱ्या प्रवाशांकडून पैशांऐवजी लैंगिक संबंध ठेवले जात आहे. त्यामुळे एचआयव्हीचे प्रमाण वाढण्याचा धोका असल्याचे म्हटले जात आहे. मेकरेरे युनिवर्सिटी कॉलेज ऑफ एजुकेशन एंड एक्सटर्नल स्टडीजने (CEES) याबाबतचे संशोधन केले. त्यांच्या संशोधनात ही बाब उघड झाली.

    युगांडामध्ये मोटरसायकल कॅब चालकांमध्ये युवकांचे प्रमाण अधिक आहे. एका अभ्यासानुसार, २८१ पैकी १२ टक्के कमर्शियल रायडर्स पैसे न देऊ शकणाऱ्या प्रवाशांसोबत लैंगिक संबंध ठेवत असल्याचे समोर आले. संशोधनत सहभागी झालेल्या ६५.७ टक्के जणांनी मागील १२ महिन्यात एकहून अधिकांसोबत लैंगिक संबंध ठेवले असल्याचे मान्य केले.

    युगांडातील २३ टक्के चालकांनी एकाच वेळेस अनेक जोडीदारांसोबत लैंगिक संबंध असल्याचे मान्य केले. त्याशिवाय ५७.१ टक्के जणांनी लैंगिक संबंध ठेवताना निरोधचा वापर केला नसल्याचे सांगितले.

    या अभ्यासाचे संशोधक लिलियन मबाजी यांनी सांगितले की, एकापेक्षा अधिक जोडीदारासोबत लैंगिक संबंध ठेवणे हे धोकादायक आहे. विशेषत: निरोधाच्या वापराशिवाय असे संबंध ठेवणे अधिकच धोकादायक आहे. निरोधाचा वापर न केल्यामुळे एचआयव्ही, अनावश्यक गर्भधारणा, लैंगिक आजार होऊ शकतात. युगांडाच्या युवकांचा बेजबाबदारपणा लक्षात घेता लैंगिक शिक्षण आणि सुरक्षित शरीर संबंधाबाबत अधिक जनजागृती आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

    हा संशोधन अभ्यास युगांडाच्या वॅकिसो आणि नामइंगो जिल्ह्यात करण्यात आला. युगांडा एड्सविरोधी मोहिमेचे प्रमुख डेनियल बयाबाकामा यांनी सांगितले की, टॅक्सी सेवेचा वापर केल्यानंतर काही प्रवाशी सेक्स करण्याची ऑफर देतात. त्यामध्ये अनेकजण निरोधशिवाय सेक्स करतात. असे कृत्य हे जोखमीचे असून चिंताजनक आहे. अशामुळे एचआयव्ही बाधितांची संख्या वाढण्याचा धोका आहे. युगांडामध्ये ५.६ टक्के लोकांना एचआयव्हीची लागण झाली आहे.

    बयाबाकामा यांनी सांगितले की, एचआयव्हीचा प्रसार थांबवण्यासाठी पावले उचलण्याची आवश्यकता असून काही गोष्टींना प्राथमिकता देणे आवश्यक आहे. यामध्ये मोफत निरोधचे वाटप झाले पाहिजे. जेणेकरून युवकांचा लैंगिक आजारापासून काही प्रमाणात बचाव होऊ शकतो.

    पॅट्रिक नावाच्या एका मोटरसायकल कॅब चालकाने ‘द गार्डियन’ला सांगितले की, ट्रांजेक्शन सेक्स आणि अनेक लैगिंक संबंधाचे जोडीदार असणे हे जोखमीचे आहे. मात्र, ग्राहक पैसे देत नसतील आणि पैशांच्या ऐवजी सेक्स करण्याची ऑफर कोणी देत असेल तर टाळण्याचे काही कारणच नसल्याचे त्याने सांगितले. तर, जोसेफ नावाच्या चालकाने म्हटले की, काही महिला प्रवाशी अतिशय जिद्दी असतात. त्या जाणूनबुजून पैसे देत नाहीत. त्याऐवजी सेक्सची डील करतात. अनेकदा आमच्याकडे निरोध नसतात. त्यामुळे असुरक्षितपणे लैंगिक संबंध ठेवावे लागत असल्याचे जोसेफने सांगितले.

    viral news sex instead of fare motorcycle taxis threaten ugandas fight against aids