Viral Pic Of Baby Removing Doctor's Mask Becomes Symbol Of Hope
बाळाने डॉक्टरच्या तोंडावरची 'मुखपट्टी काढणं' हा नेमका काय संकेत आहे?

अशी स्थिती लवकरच सगळ्यांच्या आयुष्यात येवो हा त्याचाच संकेत म्हणावा का? डॉ समीर चेएब

  • व्हायरल फोटो ठरला आशेचे प्रतिक

कोरोना महामारी (Corona epidemic)  दरम्यान एक नवजात बाळ (New Born Baby) जन्माला आल्यानंतर त्याच्या सोबत असलेल्या डॉक्टरच्या चेहऱ्यावरची मुखपट्टी (मास्क) काढण्याचा प्रयत्न करत आहे. या एका जुन्या फोटोने सोशल मीडियावर अक्षरक्ष: कल्ला केला आहे.

या वर्षाच्या सुरूवातीलाच सुरू झालेल्या या महामारीने जगाला एक नवा आयाम दिला आहे. यामुळे लोकांच्या जीवनशैलीत खूपच बदल झाले आहेत. सर्वच देशांनी या महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे घराबाहेर पडताना तोंड आणि नाकावर मुखपट्टी असणे अनिवार्य आहे असा फतवाच काढला आहे. यामुळे अनेकजण या निर्णयाचे पालन करत असून चेहऱ्यावर मुखपट्टी परिधान करत आहेत. पण चेहऱ्यावर मुखपट्टी लावल्याने सर्वसामान्यांना अडचणीचे होत असल्याने राग आणि इतरांच्या रोषालाही बळी पडावे लागत आहे.

अधिकाधिक लोकं ही परिस्थिती पूर्वपदावर यावी आणि आपले जीवन पूर्वीप्रमाणेच सुरळीत व्हावे याच्या प्रतिक्षेत आहेत. अशा परिस्थितीत एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली आहे. एका नवजात बाळाचा फोटो सापडला. आपल्याला आलेला राग व्यक्त करण्यासाठी या बाळाने चक्के डॉक्टरच्या तोंडावर असलेली मुखपट्टी ओढत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

हा फोटो इंस्टाग्रामवर युएईचे स्त्रीरोग तज्ञ डॉ. समीर चीब यांनी शेअर केला होता. हे नवजात बाळ आपल्याला आलेला राग व्यक्त करण्यासाठी आपल्या नाजूक हातांनी डॉक्टरच्या चेहऱ्यावरील मुखपट्टी ओढण्याचा प्रयत्न करत आहे कारण त्याला या मुखपट्टीच्या आत दडलेला चेहरा पाहण्याची इच्छा आहे.

 

डॉक्टरच्या चेहऱ्यावरील मुखपट्टी बाजूला करतानाचा हा नवजात बाळाचा फोटो आता आशेचे प्रतिक बनला आहे.
डॉ. समीर चेएब यांचा हा फोटो भविष्यातील उत्तम आशेचे प्रतिक बनला आहे.

आपण लवकरच ही मुखपट्टी कायमची आपल्यापासून दूर करणार आहोत असं एका व्यक्तीने म्हटलं असून हा २०२० चा फोटो असायला हवा असं दुसऱ्याने म्हटलं आहे.

एका समीक्षकाने लिहिलं आहे की, हा मी पाहिलेला सर्वात सुंदर फोटो आहे. आशा आहे की, लवकरच आपण या मुखपट्टीच्या जाचातून आपली सुटका करून घेण्यात यशस्वी होऊया.

मार्चमध्ये काढलेला हा फोटो त्या काळात कोरोना महामारीने सर्वात अधिक प्रार्दुभाव झालेल्या देशांपैकी इटलीतील असून तो आशेचे प्रतिक बनला आहे. लवकरच सर्व काही ठीक होणार आहे. असे शब्द या बाळाच्या डायपर लिहिल्याने मोठ्या प्रमाणात हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.