साप्ताहिक राशीभविष्य, ११ जुलै ते १७ जुलै २०२१; कन्या राशीच्या जातकांच्या प्राप्तीत वाढ होईल, वाचा या आठवड्याचं राशीभविष्य

  मेष :

  हा आठवडा आपल्यासाठी उत्तम आहे. आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रीत कराल व त्यामुळे आपली कामगिरी चांगली होऊ शकेल. कौटुंबिक जीवनातील समन्वय उत्तम राहील. कुटुंबियांच्या गरजा आपण समजून घ्याल. घरगुती खर्चात वाढ होईल. घरासाठी एखाद्या नवीन वस्तूची खरेदी करू शकाल. कुटुंबियांच्या खुशीने आपणास मनःशांती मिळेल. प्राप्तीत वाढ होईल. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. आपल्या व्यावसायिक भागीदारामुळे आपणास चांगला लाभ होईल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. आपण एकमेकांप्रती आपल्या जवाबदाऱ्या पार पाडाल व त्यामुळे आपले नाते अधिक दृढ होईल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा उन्नतीदायक आहे. आपण आपल्या संबंधांप्रती अधिक गंभीर व्हाल. आपली प्रकृती उत्तम राहील विद्यार्थ्यांना अध्ययनात चांगले परिणाम मिळतील. आपले कष्ट सार्थकी लागतील. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

  वृषभ :

  हा आठवडा आपल्यासाठी उत्तम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवाती पासूनच आपल्या प्राप्तीत वाढ होत असल्याचे दिसून येईल. त्यामुळे आपण सहजपणे खर्च करू शकाल. असे असले तरी खर्चात वाढ होत राहील, त्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रकृतीत सुधारणा होईल. आहारावर नियंत्रण ठेवावे. कौटुंबिक जीवन तणावग्रस्त राहील. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. समजूतदारपणा दाखवून आपल्या प्रत्येक कामात जोडीदार आपणास मदत करेल. प्रणयी जीवनात आपली प्रियव्यक्ती आपल्यावर काही कारणाने नाराज होण्याची शक्यता असल्याने काळजी घ्यावी. प्रियव्यक्ती नाराज झाल्यास तिची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करावा. आठवड्याचे सुरुवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. नवीन मैत्री करण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागेल. काही विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशी जाऊ शकतात.

  मिथुन :

  हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरुवातीस आपल्या खर्चात वाढ झाल्याने आपण चिंतीत व्हाल. विनाकारण खर्च झाल्याने महत्वाची काही कामे खोळंबतील असा विचार आपल्या मनात येऊ शकतो. आपणास आर्थिक नियोजन करावे लागेल. आपली प्रकृती चांगली राहिल्याने आपण सर्व कामे स्फूर्तीपूर्वक कराल. प्राप्तीत हळू हळू वाढ होईल. आपण जर व्यापार करत असाल तर कामात वाढ होऊन आपल्या नफ्यात सुद्धा वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांना कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. तसेच आपला एखादा मित्र सुद्धा आपणास मदत करू शकेल. विवाहितांना वैवाहिक जीवनाचा आनंद घेता येईल. एकमेकांप्रती जवळीक वाढेल. प्रेमीजनांनी एकमेकांवर चुकीचे आरोप करण्या ऐवजी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

  कर्क :

  हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीपासूनच आपण स्वतःवर लक्ष द्याल. आपल्या गरजांवर खर्च कराल. आपण स्वतःसाठी काय केले हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण कराल. त्यामुळे नवीन शैलीने जीवन जगण्याचा प्रयत्न आपण कराल. वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. आपण आपल्या वैयक्तिक आयुष्याचा आनंद घेऊ शकाल. प्रणयी जीवनात आपली प्रियव्यक्ती आपणास आवडणार नाही अशी एखादी गोष्ट आपणास सांगण्याची शक्यता असून त्याने नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. हा दुरावा नष्ट करण्यासाठी आपणास प्रियव्यक्तीस समजून घ्यावे लागेल. नोकरीत आपली कामगिरी चांगली होईल. सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य आपणास मिळू शकेल. शासनाकडून काही लाभ होऊ शकतो. व्यापाऱ्यांसाठी ह्या आठवड्यात आर्थिक लाभाची दालने उघडतील. आपली प्रकृती उत्तम राहील. आठवड्याचे अखेरचे दोन दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

  सिंह :

  आठवड्याच्या सुरुवातीपासूनच आपणास नातेसंबंध टिकविण्याचे प्रयत्न करावे लागतील. ह्या दरम्यान नातेसंबंधातील संभाव्य कटुता टाळण्यासाठी आपणास पुढाकार घ्यावा लागेल. ह्या दरम्यान आपणास जर जोडीदाराचा पाठिंबा मिळू शकत नसला तर त्यांच्या दृष्टिकोनातून वस्तुस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे आपणास समस्येच्या मुळा पर्यंत जाण्यास मदत होईल. एकमेकांच्या दृष्टिकोनातून वस्तुस्थिती समजून घेतल्यास आपल्या नात्यात समन्वय निर्माण होईल. नात्यातील हरवलेले प्रेम पुन्हा प्राप्त होईल. आठवड्याच्या मध्यापर्यंत आपणास आपल्या ऊर्जेचे स्तर खालावत असल्याचे दिसून येईल. ह्या दरम्यान आपणास सुस्ती जाणवेल. प्रकृतीत चढ – उतार संभवतात. आठवड्याचे अखेरचे दिवस आपणास अडचणीतून दिलासा देण्याचे कार्य करू शकतील. ह्या दरम्यान आपणास नियोजनबद्ध राहून व्यवसायात मार्गक्रमण करावे लागेल. व्यापाऱ्यांना व नोकरी करणाऱ्यांना कामा निमित्त प्रवास करावे लागतील. ह्या दरम्यान आपण जर नवीन उत्पादन किंवा सेवा बाजारात आणू इच्छित असाल तर त्यासाठी आपणास अनुकूलता लाभेल. ह्या कार्यात आपणास जुन्या संबंधांची मदत मिळण्याची शक्यता सुद्धा आहे.

  कन्या :

  आठवड्यात आपण आपल्या कुटुंबियांच्या सहवासात भरपूर वेळ घालवू शकाल. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. प्राप्तीत वाढ झाल्याने आपण हर्षित व्हाल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी चुकीचा व्यवहार आपल्यासाठी त्रासदायी ठरण्याच्या शक्यतेमुळे काळजी घ्यावी. नोकरीत केलेले प्रयत्न सार्थकी लागतील. आपणास आपल्या कष्टांचे यथोचित फळ मिळेल. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा काळजी घेण्याचा आहे. शत्रूंच्या कारवाया वाढल्याने आपले नुकसान होऊ शकते. तसेच आपल्या व्यावसायिक भागीदाराशी आपले संबंध बिघडण्याची शक्यता आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन आव्हानात्मक राहील. त्यास आपणास शांत राहून व धीराने तोंड द्यावे लागेल. ह्याकडे विशेष लक्ष द्यावे. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आपल्या प्रकृतीत सतत चढ-उतार येतील. हा आठवडा प्रवासासाठी अनुकूल आहे.

  तूळ :

  हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणारा आहे. आपल्या व्यापारात उत्तरोत्तर वृद्धी होईल. आपण आपल्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकाल. नोकरी करणाऱ्या जातकांना सुद्धा आपल्या कष्टाचे यथोचित फळ मिळेल. आरोग्य पूर्वी प्रमाणेच राहील. वैवाहिक जीवनात परस्पर संबंधात थोडी कटुता येण्याची शक्यता असल्याने काळजी घ्यावी लागेल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपल्या प्रियव्यक्तीस खुश करण्यासाठी त्यांना भरपूर संधी मिळेल. कुटुंबात समन्वय नसल्याने आपणास थोडा त्रास होऊ शकतो. आठवड्याचे अखेरचे दोन दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. आपण प्रवासाचा आनंद घेऊ शकाल.

  वृश्चिक :

  हा आठवडा आपणास सामान्य फळे देणारा आहे. आठवड्याच्या सुरुवातीस आपण आपल्या कुटुंबियांच्या सहवासात बराच वेळ घालवाल. घरगुती कामात लक्ष देऊन त्यासाठी खर्च सुद्धा कराल. आठवड्याच्या मध्यास मुलांना फिरावयास न्याल व त्यांच्यासाठी नवीन काही पुस्तकांची खरेदी सुद्धा करू शकाल. आठवड्याच्या अखेरीस काही आव्हाने समोर येतील. त्या दरम्यान काही चिंता आपणास सतावतील. तसेच पैशांचा अतिरिक्त खर्च सुद्धा होऊ शकतो. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. प्रेमीजनांनी विशेष काळजी घ्यावी. आपण खोटे बोलल्यास त्याचा नात्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. हा आठवडा नोकरी करणाऱ्यांसाठी विशेष अनुकूल नाही. कामावर लक्ष द्यावे लागेल. कोणत्याही कारणाने वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. हा आठवडा प्रवासासाठी प्रतिकूल आहे. आठवड्यात आपले आरोग्य सामान्यच राहील.

  धनु :

  हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपणास भविष्यात खूप मोठा फायदा होऊ शकेल अशा एखाद्या नवीन करारावर आपण स्वाक्षरी करण्याची शक्यता आहे. आपल्या खर्चात वाढ होईल. ह्या आठवड्यात प्राप्ती सामान्यच होईल. वैवाहिक जीवनात आपल्यावर प्रेमाचा वर्षाव होईल. एखाद्या क्षेत्रात जोडीदारास प्रसिद्धी मिळेल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला असून त्यांच्या नात्याची वीण घट्ट होईल. नोकरी करणाऱ्या जातकांचे कामातील लक्ष कमी झाल्याने एखाद्याशी मोठा वाद होण्याची शक्यता असून नोकरीवर गदा येऊ शकते. तेव्हा काळजी घ्यावी. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. त्यांना आपल्या व्यापारी नीतिमूल्यांचा मोठा फायदा होईल. आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. हा आठवडा प्रवासासाठी प्रतिकूल आहे.

  मकर :

  हा आठवडा आपणास अत्यंत चांगली फळे देणारा आहे. आपणास मिळणाऱ्या संधींचा यथोचित लाभ आपण घ्यावयास हवा. आठवड्याच्या सुरुवातीस आपण एखादा प्रवास करू शकाल. आपणास काही नवीन लोकांना भेटण्याची व नवीन मैत्री करण्याची संधी मिळेल. व्यक्तिगत जीवनात आनंद पसरेल. प्रणयी जीवनात आनंदाचे क्षण येतील. विवाहितांना काही समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. काही कारणाने सासुरवाडीकडील लोकांशी मतभेद संभवतात. नोकरीत चांगली कामगिरी होईल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपली प्रकृती नाजूक राहील. वाहन काळजीपूर्वक चालवावे. आपण आपल्या काही इच्छा पूर्ण करू शकाल. आपण जर संगीत तज्ञ असाल तर त्यात नवीन काही करण्याचा प्रयत्न आपण कराल. ह्या आठवड्यात आपणास जीवनात नवीन काही करण्याची संधी मिळेल. आपण मानसिक तणावापासून मुक्ती मिळवाल. आपण आपला एखादा जुना छंद आठवून त्यात प्रगती साधण्याचा प्रयत्न कराल. ह्या आठवड्यात आपल्या प्रियव्यक्तीसह बाहेर फिरावयास जाऊ शकाल.

  कुंभ :

  आठवड्याच्या सुरुवातीस आपली मनःस्थिती विशेष चांगली असणार नाही. आपण एखाद्या चिंतेने ग्रस्त असाल व त्यामुळे काही कामात अडथळे येऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी मात्र आपली कामगिरी चांगली होईल. कामगिरी चांगली झाल्यामुळे वरिष्ठांची शाबासकी सुद्धा मिळू शकेल. असे असले तरी सुद्धा आपल्याला अपेक्षित असलेले फळ आपणास मिळू शकणार नाही. वैवाहिक जीवनातील तणाव कमी होतील, मात्र आपणास स्वतःवर संयम ठेवावा लागेल. ह्या दरम्यान निष्कारण रागावू नका. हा आठवडा प्रणयी जीवनासाठी महत्वाचा आहे. ह्या दरम्यान आपल्या प्रियव्यक्तीस आपण लग्नाची मागणी घालू शकाल. आपले आरोग्य चांगले राहिले तरी तणावग्रस्त वातावरणामुळे पोटदुखी, डोकेदुखी इत्यादींचा त्रास होऊ शकतो. ह्या आठवड्यात आपण जो प्रवास कराल त्यात नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल.

  मीन :

  हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. नशिबाची साथ मिळून आपला खूप मोठा फायदा होईल. आपण आपल्या प्रणयी जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. आपल्या कुटुंबीयांची त्यास काहीच हरकत नसेल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे असेल. आपणास आपली व्यक्तिगत बाब कुटुंबियांना सांगताना बिलकुल संकोच वाटणार नाही. नोकरीच्या ठिकाणी मात्र वरिष्ठांच्या नाराजीस सामोरे जावे लागेल, तेव्हा कामावर पूर्ण लक्ष द्यावे. व्यापाऱ्यांना व्यापारा निमित्त प्रवास करावे लागतील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. विशेषतः इंजिनीरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या विषयांचे उत्तम ज्ञान प्राप्त होईल. त्यांची एकाग्रता सुद्धा वाढेल. हा आठवडा आरोग्याच्या दृष्टिकोनातून सामान्यच आहे. आपणास नेत्र विकार होण्याची शक्यता आहे.

  Virgo income sources will increase read this weeks horoscope