सुखाची झोप घ्यायचीये? करा हे घरगुती उपाय; आठवड्यातून दोन-तीनदा हा उपाय केल्यास अनिद्रा होईल छू-मंतर

काहीजणांना तणावामुळे झोपच लागत नाही. अनेकजण झोपेसाठी गोळ्यांची मदत घेतात जे आरोग्यासाठी अत्यंत हानीकारक आहे. अशातच आपण झोपेच्या गोळ्यांचे सेवन न करता काही घरगुती उपाय केल्यास चांगली झोप घेता येऊ शकते हे खूपच गरजेचे आहे.

    आपल्या सर्वांनाच हे ठाऊक आहे की, उत्तम आरोग्यासाठी सुखाची झोप येणं हे खूपच गरजेचं आहे. असं म्हणतात सुखाची झोप घेतल्याने आपले शरीर आणि मेंदूला आराम देते आणि आपल्याला उर्जा प्रदान करते, जे उत्तम शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. पण, ज्या लोकांची झोप पूर्ण होत नाही अशांना अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागण्याची टांगती तलवार कायम असते.

    अनेकांना इच्छा असूनही आपले रूटीन फॉलो करता येत नाही, कारण कामाचा प्रचंड ताण आणि कंप्युटरसमोर तासनतास बसून राहण्यामुळेही झोप पूर्ण होत नाही. काहीजणांना तणावामुळे झोपच लागत नाही. अनेकजण झोपेसाठी गोळ्यांची मदत घेतात जे आरोग्यासाठी अत्यंत हानीकारक आहे. अशातच आपण झोपेच्या गोळ्यांचे सेवन न करता काही घरगुती उपाय केल्यास चांगली झोप घेता येऊ शकते हे खूपच गरजेचे आहे. तर जाणून घेऊया अशाच काही घरगुती उपायांबाबत…

    • जाणकार म्हणतात झोपण्यापूर्वी ३-४ तास आधी जेवण करायला हवे. शक्य असल्यास काहीवेळ फेरफटका मारून या, कारण जेवल्यानंतर लगेचच झोपल्याने आपल्या पोटात असलेलं आम्ल शरीरातल्या अन्ननलिकेत येते. यामुळे डोकेदुखी होऊ शकते आणि इच्छा असूनही आपल्याला चांगली झोप घेता येत नाही.
    • झोपण्यापूर्वी टीव्ही, कंप्युटर आणि मोबाइल फोनवर काम करणे टाळावे. याशिवाय चहा, कॉफी सारख्या पदार्थांचे रात्री सेवन करणे टाळावे. रात्री हलका आहार घेण्याचा प्रयत्न करावा.
    • असं म्हणतात की, झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध नक्कीच प्यायला हवे, कारण दूध प्यायल्याने अनिद्रेतून आपली मुक्तता होते. याशिवाय तुम्ही चेरी, खसखस,मेवा इत्यादींचे सेवनही करू शकता.
    • संशोधनानुसार, रात्री भात खाल्ल्याने झोप चांगली येते, कारण तांदळात अधिक प्रमाणात ग्लायसेमिक इंडेक्स आढळते. सोबतच यात ट्रिप्टोफेन आणि सेरोटोनिन नामक रसायन झोपण्यासाठी मदत करतात.
    • डॉक्टरांच्या मते, जर तुम्हाला रात्री नीट झोप येत नसेल तर, दिवसा कमीत कमी १० ते २० मिनिटांची झोप घ्यावी. यामुळे तुमचा मूडही फ्रेश होईल आणि तुमचं कामातही व्यवस्थित लक्ष लागेल.
    • शरीराची मालिश केल्याने झोपेची गुणवत्ता सुधारता येते. यासाठी, आपल्याला आठवड्यात दोन ते तीन वेळा शरीराला मालिश करून घेणे गरजेचे आहे.
    • झोपण्यापूर्वी हात-पाय स्वच्छ धुवावेत आणि त्यानंतर आपल्या पायाच्या तळव्यांना मालिश करावी. यामुळे रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते आणि थकवाही दूर पळून जातो. चांगल्या झोपेसाठी दररोज झोपण्यापूर्वी अशाप्रकारे मालिश केल्याने अनिद्रेची समस्या दूर होईल.

    महत्त्वाची सूचना : या घरगुती उपायांचा जर फायदा झाला नाही तर डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.