अशी घ्या तुमच्या कपड्यांची काळजी, कपडे होतील तुमचे मित्र

जर तुमचे कपडे नाजूक फॅब्रिकपासून बनलेले असतील तर असे कपडे उन्हात वाळत घालू नका. जर उन्हात वाळत टाकणं गरजेचे असेल, तर कपडे उलटे वाळत घाला. जर तुमच्या कपड्यांना डाग लागले तर कपडे धुताना मिठाचा वापर करा.

सध्याच्या ट्रेंडिंग आयुष्यात आपले कपडे आणि आपली स्टाईल खूप महत्त्वाची असते. त्यामुळे ते नीट धुण्यापासून त्यांचा रंग न जाण्यापर्यंत आपल्याला आपल्या कपड्यांची खूप काळजी असते. खरं तर बहुतेक वेळा कपड्यांना उन्हात वाळवल्याने त्यांचा रंग जातो. तुमच्या कपड्यांची खास काळजी घेण्यासाठी खालील काही खास टिप्स आज आपण जाणून घेऊया.

– थंड पाण्यातच कपडे धुवा

गरम किंवा कोमट पाण्यात कपडे धुतले की त्यांची चमक कमी होते आणि त्यांचा रंगही उतरतो. त्यामुळे कपड्यांना नेहमी थंड पाण्यात धुवा.

– भडक रंगाचे कपडे वेगळे धुवा

डार्क आणि काळ्या रंगाचे कपडे वेगळे धुवा, कारण त्यांचा रंग लगेच निघतो. आकाशी आणि हिरव्या रंगाच्या कपड्यांचा लगेच रंग निघतो. त्यामुळे त्या कपड्यांना वेगळं धुवा. यामुळे त्याचा रंग तुमच्या इतर कपड्यांना लागणार नाही.

– योग्य प्रकारे कपडे वाळत घाला

कपड्यांना योग्य प्रकारे सुकवलं नाही की त्यांचा रंग उतरतो. पाण्यातून काढल्यानंतर कपड्यांना योग्य पद्धतीने पिळून काढा. त्यांना झटका आणि कपडे उलटे करून तारेवर वाळत घाला. त्यामुळे कपड्याला हवा लागते आणि ते नीट सुकतात.

– कपड्यांना उन्हात वाळत घालू नका

जर तुमचे कपडे नाजूक फॅब्रिकपासून बनलेले असतील तर असे कपडे उन्हात वाळत घालू नका. जर उन्हात वाळत टाकणं गरजेचे असेल, तर कपडे उलटे वाळत घाला.

– कपडे धुण्यासाठी फॅब्रिक कंडिशनरचा वापर करा

नाजूक कपडे धुण्यासाठी शक्यतो फॅब्रिक कंडिशनरचा वापर करावा.

-कपडे वाळवण्यासाठी ड्रायरचा वापर टाळा

ड्रायरच्या वापराने कपड्यांचा रंग लगेच उतरतो. त्यामुळे ड्रायरचा वापर करण्यापेक्षा मोकळ्या हवेत कपडे सुकवा.

– मिठाचा वापर करा

जर तुमच्या कपड्यांना डाग लागले तर कपडे धुताना मिठाचा वापर करा.