१४ ते २० मार्च २०२१ चे साप्ताहिक राशीभविष्य; कोणत्या राशीच्या नोकरदारांना मिळणार दिलासा, वाचा या आठवड्याचं आपलं राशीभविष्य

  मेष :

  योग्य संकल्प केल्यास बहुतांश गोष्टी सफल होऊ शकतील आणि त्याचे समाधान मिळेल. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. कलाक्षेत्राला चांगले प्रोत्साहन मिळेल. आर्थिक बाजू ठीक राहील. आप्तेष्टांच्या गाठीभेटीचे योग येतील. रागावर नियंत्रण ठेवा. प्रवासाचे बेत साध्य होतील. प्रकृतीस्वास्थ्य जपा, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. जोडीदाराची साथ मिळेल.

  वृषभ :

  प्रत्येक कार्यात सावधानता बाळगल्यास पुष्कळ गोष्टींचे समाधान मिळू शकेल. सरकारी नियमांचे कटाक्षाने पालन करा. आपल्या बोलण्याने इतरांची मने दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्या. नोकरदारांना दिलासा मिळेल. घरच्या कर्तव्यांना प्राधान्य द्या. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या. मोसमी आजारांपासून सावध राहा. जोडीदाराची साथ मिळेल.

  मिथुन :

  आपण कामाचे नियोजन करण्याचे ठरविल्यास उद्दिष्ट साध्य करू शकाल. नोकरदारांना दिलासा मिळेल. दूरच्या आप्तेष्टांच्या संपर्कात राहाल. स्थावरबाबतच्या प्रश्नांना चालना मिळेल. आपल्याबद्दल गैरसमज होणार नाही, याची दक्षता घ्या. चिंता करण्याचे टाळल्यास पुष्कळशा गोष्टी सुलभ होतील. आर्थिक बाजू ठीक राहील. जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे, तेव्हा जपा.

  कर्क :

  आपण घेत असलेल्या प्रयत्नांना मूर्तरूप प्राप्त होऊन, यशाची वाटचाल करू शकाल. हितशत्रूंपासून सावध राहा. आपल्या कौशल्याचा उपयोग करून कामाचे ध्येय गाठा. वादविवादाचे प्रसंग कटाक्षाने टाळा. कौटुंबिक वातावरण चांगले ठेवा. प्रवासाचे योग संभवतात. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. प्रकृती जपा, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, मोसमी आजारांपासून सावध राहा.

  सिंह :

  हा सप्ताह सर्वसाधारण स्वरूपाचा असणार आहे. काही समस्यांतून मार्ग काढावा लागणार आहे. नोकरदारांना दिलासा मिळेल. प्रवास योग येतील. व्यावहारिक गोष्टींना प्राधान्य द्या. हितशत्रूंपासून वेळीच सावध राहा, त्यांना संधी देऊ नका. सरकारी नियमांचे उल्लंघन टाळा. संगणक, तांत्रिक क्षेत्रातील व्यक्तींना चांगला काळ आहे. प्रकृतीस्वास्थ्य जपा, मोसमी आजारांपासून सावध राहा. वैवाहिक जोडीदाराशी जुळवून घ्या.

  कन्या :

  विविध क्षेत्रांत प्रगती करण्याची संधी प्राप्त होईल. जे काही करण्याची इच्छा आहे त्या सर्व गोष्टी सफल करता येतील. मित्रमंडळींसमवेत बाहेर जाण्याचा बेत आखाल. व्यापार-उद्योगात आगेकूच करता येईल. प्रवासात सावधानता बाळगा. स्थावरबाबतच्या प्रश्नांना चालना मिळेल. प्रकृतीस्वास्थ्य जपा, विशेषतः उष्णतेच्या विकारांपासून सावध राहा. जोडीदाराची साथ मिळेल.

  तूळ :

  आपणास विविध प्रकारच्या लहान-मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. समस्यांतून मार्ग काढण्याची तयारी ठेवा. वादविवादाचे प्रसंग कटाक्षाने टाळा. नोकरदारांना काहीसा दिलासा मिळेल. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या. नातलगांशी सामंजस्याने वागा. प्रवासात सावध राहा. विरोधकांना संधी देऊ नका. अनावश्यक खर्च टाळा. प्रकृतीस्वास्थ्य जपा, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. जोडीदाराशी जुळवून घ्या.

  वृश्चिक :

  बहुतांश गोष्टी साकार होण्याच्या दृष्टीने हा आठवडा आशादायी स्वरूपाचा जाईल. सर्व गोष्टी आपल्याप्रमाणेच होतील अशी धारणा न ठेवता, येणाऱ्या समस्यांना धैर्याने सामोरे जाण्याचा प्रयत्न करा. कामाचा व्याप वाढेल. स्थावर-जंगमबाबतच्या प्रश्नांना चालना मिळेल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना हा काळ उत्तम आहे. जोडीदाराला खूश ठेवा. नोकरदारांनी वरिष्ठांशी जुळवून घ्यावे. प्रकृतीस्वास्थ्य जपा.

  धनु :

  या सप्ताहात कार्यालयीन व कौटुंबिक कामात व्यग्र राहाल. प्रलंबित कामांना प्राधान्य द्या आणि नव्या कामांना सुरुवात करा. घाईगडबडीत कोणतीही कामे करण्याचे टाळा. कामाचा कंटाळा न करता कार्यात झोकून द्या. ज्येष्ठांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना चांगला काळ आहे. प्रलोभनात अडकू नका. स्थावर-जंगमबाबतचे प्रश्न सुटू शकतील. जुने दुखणे डोके वर काढण्याची शक्यता आहे, तेव्हा जपा.

  मकर :

  महत्त्वाच्या गोष्टींच्या अनुभवाचा उपयोग करून, कामे सफल करू शकाल. नोकरदारांना दिलासा मिळेल. कलाक्षेत्राला चांगला प्रतिसाद मिळेल. महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. सरकारी नियमांचे पालन करा. प्रवासाचे योग येतील. बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल. व्यवहारात सावधानता बाळगा. आप्तेष्टांशी सौदार्याने वागणे हितकारक राहील.

  कुंभ :

  बऱ्याच क्षेत्रांत अनुकूलता लाभल्याने, आपले ध्येय गाठणे शक्य होईल. नोकरदारांना दिलासा मिळेल. कलाक्षेत्राला प्रोत्साहन मिळेल. स्वतःवर फोकस ठेवल्यास उत्तम राहील. खर्चावर योग्य नियंत्रण ठेवा. प्रवासात सावधानता बाळगा, विशेषतः खरचटणे, लागणे याकडे लक्ष द्या. स्थावरसंबंधीच्या प्रश्नांना चालना मिळेल. कर्ज घेण्यापासून दूर राहा. खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, नियमित व्यायाम व योगाचा अवलंब करा.

  मीन :

  आपण प्रत्येक बाबतीत हुशारीने वागल्यास पुष्कळशा अपेक्षित गोष्टी साध्य करता येतील. कामाचा उत्साह वृद्धिंगत होईल. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या. कलाक्षेत्राला उत्तम वाव मिळेल. आर्थिक बाजू सुधारेल. प्रवास कराल. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. नवीन वस्तू खरेदीचे बेत आखाल. पायाच्या दुखण्याबाबत सावध राहा. वैवाहिक जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.