पक्ष्यांना दाणे टाकल्याने होतात अनेक लाभ, अधिक माहिती जाणून घ्या

पक्ष्यांना दाणे टाकणे(benefits of feeding birds) शुभ मानले गेले आहे. पक्ष्यांना दाणा टाकण्याचे काय फायदे आहेत ते आपण जाणून घेऊयात.

    वास्तूशास्त्रानुसार(Vastushastra) पक्ष्यांना दाणा-पाणी देणे शुभ मानले जाते.अनेक लोक घराच्या गच्चीवर किंवा बाल्कनीमध्ये चिमण्यांसाठी दाणे टाकून ठेवतात. जी व्यक्ती पक्ष्यांना दाणे टाकते त्यांच्यावर लक्ष्मी देवी प्रसन्न होते. पक्ष्यांना दाणे टाकणे शुभ मानले गेले आहे. पक्ष्यांना दाणा टाकण्याचे काय फायदे आहेत ते आपण जाणून घेऊयात.

    • कबूतर दाणे खायला आल्यास शुभ मानलं जातं कारण कबूतर बुध ग्रहाचा मानला गेला आहे. कबूतर शांतिचा प्रतीक आहे. तसेच काही लोक पक्ष्यांसाठी गच्चीवर दाणा टाकतात. गच्ची राहूचं प्रतीक आहे. जेव्हा कबूतर गच्चीवर दाणा खाण्यास येतात तेव्हा बुध आणि राहूचं मिलाप होतं.
    • पक्ष्यांना दाणा-पाणी देण्याने जीवनातील अनेक समस्या सुटतात. एकिकडे प्रभूची भक्ती प्राप्त होते तर दुसरीकडे आरोग्य चांगलं राहतं आणि पुण्य प्राप्ती होते.
    • जर आपल्या अस्वस्थता जाणवत असेल किंवा आपली कामे वेळवर पूर्ण होत नसतील. कुटुंबात क्लेश असेल, आरोग्याची काळजी वाटत असेल तर निश्चित पक्ष्यांना दाणा खाऊ घातल्याने जीवनातील सर्व कष्ट नाहीसे होतात.
    • गहू खाऊ दिल्याने सूर्याशी नि‍गडित पीडा दूर होते.
    • तांदूळ दिल्याने मा‍नसिक त्रास दूर होऊन शांती लाभते.
    • मूगाची डाळ दिल्याने बुध ग्रहाशी निगडित समस्या सुटतात.
    • चण्याची डाळ दिल्याने गुरुची कृपा राहते.
    • कुंडलीत राहू-केतूची महादशा असल्यास पक्ष्यांना बाजरी खाऊ घालावा.

    जनावर किंवा पक्षी येत असलेली जागा स्वच्छ ठेवावी. कारण असे केले नाही तर त्या घरात राहणार्‍या लोकांवर राहू भारी पडतो आणि हे अशुभ असतं.