success

ॲपलचे(Apple) संस्थापक स्टीव जॉब्स(Steve Jobs) यांनी खूप कठीण प्रसंगाना तोंड देऊन जीवनामध्ये यश मिळवले होते. तरुणांनी यश कसे मिळवावे यासाठी त्यांनी त्रिसुत्री सांगितली आहे. त्यांनी यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ३ गोष्टी(Three things to do for becoming successful in life) कोणत्या हे सांगितलं आहे.

    ज्या व्यक्तींकडे आत्मविश्वास(Confidence) आहे त्यांना यश मिळवण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. आत्मविश्वास आपोआप तयार होत नाही. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. ॲपलचे(Apple) संस्थापक स्टीव जॉब्स(Steve Jobs) यांनी खूप कठीण प्रसंगाना तोंड देऊन जीवनामध्ये यश मिळवले होते. तरुणांनी यश कसे मिळवावे यासाठी त्यांनी त्रिसुत्री सांगितली आहे. त्यांनी यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ३ गोष्टी(Three things to do for becoming successful in life) कोणत्या हे सांगितलं आहे.

    • जीवनाकडे वेगळ्या नजरेने बघायला शिका – नेहमी आपल्या जीवनाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला शिका. सध्या सगळेजण आयुष्य एक नेमून दिलेलं काम असल्यासारखं जगत आहेत. भविष्याची काळजी करताना आपण आपला वर्तमानकाळ खराब करत आहोत. जीवनाकडे उत्साहाने बघा. असे केल्याने तुम्ही सकारात्मक राहाल आणि यशस्वी व्हाल. जीवनाकडे शक्य तितक्या सरळपणाने बघा.
    • आपल्या कामावर प्रेम करा- जीवनात जर तुम्ही आनंदी राहू इच्छित असाल तर आपल्या कामावर प्रेम करा. रिकाम घर सैतानाचं घर असत त्यामुळे नेहमी कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त राहा. त्यामुळे मन प्रसन्न राहते. तसेच आपण जीवनात सक्रीय राहतो. त्यामुळे नेहमी आपल्या कामावर प्रेम करा.
    • नेहमी आशावादी राहा – निराशावादी राहिल्याने तुम्ही यशाचे दरवाजे स्वत:च बंद करता. तसेच मानसिक तणावसुद्धा वाढवून घेता. जीवनात यशस्वी आणि सकारात्मक राहायचे असेल तर आशावादी राहायला हवे. आशेवर जग कायम आहे हे कायम लक्षात ठेवा.