अध्यात्म म्हणजे नेमकं काय?

अध्यात्म म्हणजे ब्रह्माचा/आत्म्याचा स्वभाव, ज्याचा अनुभव येण्यासाठी येथे लोकं/साधक परमार्थाला लागतात. मनुष्याचा जसा एक विशिष्ट स्वभाव आहे/असतो तसाच ब्रह्माचा/आत्म्याचादेखील एक स्वभाव आहे.

अध्यात्म म्हणजे ब्रह्माचा/आत्म्याचा स्वभाव, ज्याचा अनुभव येण्यासाठी येथे लोकं/साधक परमार्थाला लागतात. मनुष्याचा जसा एक विशिष्ट स्वभाव आहे/असतो तसाच ब्रह्माचा/आत्म्याचादेखील एक स्वभाव आहे.

 

उदा. पाण्याचा जसा एक स्वभाव असतो किंवा गुणवैशिष्ट्ये असतात परंतु त्याच पाण्याचे जेव्हा गोठून बर्फात रूपांतर होते तेव्हा त्याची गुणवैशिष्ट्ये सर्वार्थाने बदलतात. त्याचप्रमाणे मनुष्याचे जेव्हा ब्रह्म्यात परिवर्तन होते किंवा त्याला जेव्हा हळूहळू आत्मानुभूती येऊ लागते (म्हणजेच आपण देह नसून आत्मा आहोत असे जेव्हा त्यास हळूहळू आकळू लागते) तेव्हा त्याचा स्वभावादेखील मग हळहळू पालटू लागतो आणि अंती तो जेव्हा पूर्णब्रह्म होतो तेव्हा त्याच्याठायी मनुष्याचा स्वभाव न राहता संपूर्ण स्वभाव ‘ब्रह्माचा’ येतो.

 

 

* अध्यात्म म्हणजे आपलं काम प्रामाणिकपणे करणं.

* अध्यात्म म्हणजे आपलं कौटुंबिक आणि सामाजिक कर्तव्य पार पाडणं.

* अध्यात्म म्हणजे मुक्या पशू-पक्ष्यांवर देखील प्रेम करणे.

* अध्यात्म म्हणजे निरपेक्ष सत्कर्म करणे.

* अध्यात्म म्हणजे नि:स्वार्थी सेवाभाव ठेवणे.

* अध्यात्म म्हणजे सदैव कृतार्थभाव असणे.

* अध्यात्म म्हणजे विना अपेक्षा कौतुक करणे.

* अध्यात्म म्हणजे आपण प्रत्येकाशी सद्भाव आणि सतभावाने राहणे.

* अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत सदैव असणे.

* अध्यात्म म्हणजे आपण या समाजाचं काही देणं लागतो, आणि ते आपण दिलेच पाहिजे अशी मानसिकता असणे.

* अध्यात्म म्हणजे गरजवंतांना यथा शक्ती मदत करणे.

* अध्यात्म म्हणजे आपल्या बरोबर इतरांची देखील प्रगती होवो हा भाव असणे.

* अध्यात्म म्हणजे साधं, सोपं, सरळ आणि निर्मळ असणं, दिसणं, आणि वागणं.

* अध्यात्म म्हणजे फक्त पूजा, अर्चना, प्रार्थना आणि भक्ती नव्हे तर, अध्यात्म म्हणजे केलेली पूजा, अर्चना, प्रार्थना आणि भक्ती याप्रमाणेच आपली प्रत्येक कृती असणे.

* अध्यात्म म्हणजे राष्ट्रपुरुष आणि राष्ट्रीय संताचं सदैव स्मरण असणे.

* थोडक्यात अध्यात्म म्हणजे सकाळपासून रात्री झोपेपर्यंत नित्य कर्म, कर्तव्य पारदर्शक पद्धतीने करणे.