व्हर्जीन म्हणजे काय? जाणून घ्या ही संकल्पना आली कुठून

कॉलेज पासून ते ऑफिसच्या कॅन्टिन पर्यंत, जर आपल्यातील कुठली व्यक्ती ही लग्न झालेली नसेल तर तिला एक प्रश्न हा हमखास विचारला जातो. आणि तो म्हणजे, “तू व्हर्जिन आहे का?”

  सध्याच्या काळात व्हर्जिनीटी किंवा कौमार्य गमावणे ही खूप सामान्य आणि क्षुल्लक गोष्ट मानली जाते, पूर्वीच्या काळात या  गोष्टीला खूप महत्व असायचे. आजही कित्येक गावात स्त्रीयांच्या कौमार्य चाचण्या केल्या जातात. शहरी भागात व्हर्जिनिटी या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बऱ्यापैकी बदलला आहे. शाळेत लैंगिक शिक्षण दिल्या जात असल्याने या विषयाला समजून घेणे पालक आणि पाल्य दोघांसाठीही सहज झाले आहे. असे असले तरी कॉलेज काट्यावर या विषयाला मात्र चवीने  चघळले जाते.

  कॉलेज पासून ते ऑफिसच्या कॅन्टिन पर्यंत, जर आपल्यातील कुठली व्यक्ती ही लग्न झालेली नसेल तर तिला एक प्रश्न हा हमखास विचारला जातो. आणि तो म्हणजे, “तू व्हर्जिन आहे का?”

  आणि जर एखादी व्यक्ति व्हर्जिन असेल तर तिची तेर खेचणे किंवा तिला डीवचणे चालू होते, हे सगळं आपल्या आजूबाजूला सुरू असतं. त्यातून निर्माण होणारे वाद, कलह, अबोला तसेच न्यूनगंड ही देखील आपल्याला ठाऊक आहे. व्हर्जिन असणे म्हणजे पवित्र असणे, व्हर्जिन असणे म्हणजे सुशील संस्कारी असणे अशा सर्व व्याख्या आपल्याला माहीत आहेत.

  पण तुम्ही विचार केला आहे का, की हा वर्जिन शब्द आला कुठून असेल? सेक्स न केलेल्या व्यक्तीलाच वर्जिन असे का म्हटले जात असेल? याची सुरवात कधीपासून झाली असेल?

  व्हर्जिन या शब्दाचा शाब्दिक अर्थ पवित्र असा होतो. म्हणजे अगदी शुद्ध, पवित्र, पावन. इंग्रजी भाषेत हा शब्द पाहिल्यांदा १२०० साली ऐकण्यात आला. कॅम्ब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजच्या मॅन्यस्क्रीप्ट मध्ये uirgines हा शब्द लिहिण्यात आला आहे.

  ह्या uirgines ला नंतर virgin म्हटले जाऊ लागले. ह्याव्यतिरिक्त वर्जिन या शब्दाचा उल्लेख हा जास्तकरून ख्रिस्ती धर्माशी जुळलेला आहे. चर्चच्या फादरच्या लिखाणात व्हर्जिन शब्द आढळला. या व्यतिरिक्त व्हर्जिन शब्दाचा संबंध हा एखादि तरुण मुलगी ही धार्मिक मान्यतांनुसार पात्र आहे की नाही या अर्थाने देखील घेतला जातो. म्हणजे जर कुठल्या मुलीला चर्चमध्ये यायचं आहे, तर यासाठीच्या तिच्या पवित्रतेला वर्जिनीटी म्हटले जाते. ऑक्सफोर्ड डिक्शनरीत वर्जिन या शब्दाच्या १८ परिभाषा आहे.

  आख्यायिका 

  ही कहाणी चौथ्या-पाचव्या शतकातील असेल. तेव्हा एक राजकन्या होती अरसुला नावाची. ज्यांना आज संत अरसुला म्हणून ओळखले जाते. अरसुला हिचे पिता ब्रिटनच्या एका भागाचे राजा होते. अरसुला हिने पित्याच्या म्हणण्यावर लग्न केले. आणि आपल्या पतीला भेटण्याकरिता ११ हजार वर्जिन हेल्पर्स सोबत जहाजाने त्याच्या दिशेने निघाली.

  पावसादरम्यान अचानक वादळ आले. तेव्हा अरसुलाने निश्चय केला की, मी आधी पोपला भेटूननंतर आपल्या पतीला भेटायला जाईन. पण त्यांना वाटेत हंस मिळाले.

  हंस म्हणजे ते पक्षी हंस नाही. तर वेस्टर्न युरोपमध्ये राहणारा घुमंतू समूह. या हंस लोकांनी अरसुला सोबतच त्या ११ हजार व्हर्जिन सेविकांची हत्या केली.

  त्यामुळेच क्रिस्टोफर कोलंबस ने अमेरिकेच्या तिथल्या आयलंडचे नाव व्हर्जिन आयलंड असे ठेवले. व्हर्जिन म्हणजेच पवित्र, शुद्ध. म्हणून सेक्स न केलेल्या व्यक्तीला व्हर्जिन म्हटले जाते, म्हणजेच त्या व्यक्तीला समाजात पवित्र समजले जाते. अर्थातच ही व्याख्या व्यक्तिसापेक्ष आहे.