What to eat when you wake up in the morning
सकाळी उठल्यावर काय खावे?

सकाळी उठताना आपला रात्री उपवास घडला असल्यामुळे सकाळी पोट रिकामे असते. त्यामुळे सकाळी शरीराला ऊर्जा आणि पोषणाची गरज असते. आता अशा वेळी चहा किंवा कॉफी पिणे टाळावे. याऐवजी शरीराला पोषण देणारे पदार्थ खावेत. शरीराला ऊर्जा मिळते.

सकाळी उठताना आपला रात्री उपवास घडला असल्यामुळे सकाळी पोट रिकामे असते. त्यामुळे सकाळी शरीराला ऊर्जा आणि पोषणाची गरज असते. आता अशा वेळी चहा किंवा कॉफी पिणे टाळावे. याऐवजी शरीराला पोषण देणारे पदार्थ खावेत. शरीराला ऊर्जा मिळते. दिवस उत्साहात सुरू होतो.

चहामध्ये टॅनिन आणि कॅफिन असल्याने चहानेही उत्साह वाढतो पण रिकाम्यापोटी चहा घातल्याने पचनशक्तीवर परिणाम होतो, ॲसिडिटी वाढते, आम्लपित्त वाढते.

सकाळी शरीराला पोषक आहाराची गरज असते. पण चहा घेतल्याने भूक कमी होते. त्यामुळे चहा किंवा कॉफी पिणे टाळावे.

मग नक्की सकाळी काय खावं असा प्रश्न आपल्याला पडतो.

१) एखादं फळ, जसे वेलची केळे, चिकू, किंवा कोणतेही ऋतूनुसार मिळणारे फळ खावे.

२) भिजवलेले बदाम ४ ते ५ आणि त्याबरोबर भिजवलेल्या काळ्या मनुका आरोग्याला गुणकारी असतात.

३) १ कप हळद दूध अतिशय आरोग्यदायी आहार आहे.

४) उठल्यावर जर व्यायामाला जायचे असेल तर एखादं फळ आणि सुका मेवा किंवा १ कप दूध आणि सुका मेवा खाणे गरजेचे असते. सकाळची सुरुवात अशा आरोग्यदायी खाण्याने करण्याचे अनेक फायदे असतात.

५) दिवसभर उत्साह टिकून राहतो.

६) पोषक घटक मिळाल्यामुळे शरीराला योग्य पोषण मिळतं.

७) योग्य वेळेत खाल्ल्यामुळे सर्व पोषक घटक रक्तात मिसळतात.

८)रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते.

९) पचनक्रिया सुधारते.

१०) मानसिक आरोग्य टिकविण्यास मदत होते.