ऑफिससाठी कपडे निवडतांना…

बऱ्याचदा मुलांना ऑफिस कपड्यांची जाण नसते. मघ अनेकदा आपल्या कपड्यांमुळे आपण विनोदास पात्र ठरतो. अशी फजिती होऊ नये म्हणून आपले कपडेही ऑफिसला मॅच होतील असेच असावेत. जेणेकरून तुम्ही सगळ्यात हटके व स्टायलिश दिसू शकता.

ऑफिसमध्ये घालायला निळा, ब्राऊन, पांढरा किंवा काळा रंग वापरा. या रंगांमुळे तुम्ही अधिकच सुंदर दिसाल.

ऑफिससाठी नेहमी लेटेस्ट फॅशनचे कपडे वापरा. लेटेस्ट डिझाईनचे घालताना फार भडक कपडे घालू नका.

आपले वजन जास्त असल्यास जॉमेट्रिकल प्रिंट जसे रेघा, वर्तुळ, चौकोन, त्रिकोण अशा विविध भूमितीय प्रिंटचे शर्ट परिधान करु शकता. याने आपण स्लीम दिसाल आणि आकर्षक ही  दिसाल.

ऑफिससाठी कपडे निवडताना आपल्या ऑफिसच्या वातावरणाचेच नव्हे तर ऑफिसच्या बाहेरील परिसराचेही भान ठेवायला हवे. वातानुरुप कपडे आकर्षक वाटतात.

ऑफिस च्या मिटिंगसाठी  ग्रे, ब्लक रंगाचे वेस्ट कोड घालावे. याने तुम्ही प्रेसेन्टेबल दिसाल.

कपड्यांसोबत फाॅरमल शूज हि तेवढेच महत्वाचे. यात शक्यतो लेदर शूज ची निवड करावी.

बहुतेकजण स्टायलिश दिसण्यासाठी नको ते कपडे वापरतात आणि ऑफिसात विनोदास पात्र ठरतात. त्यापेक्षा आपणास कम्फर्टेबल वाटतील असेच फॉर्मल कपडे घाला. स्टायलिश बनायच्या नादात असे कपडे घालू नका ज्यामुळे ऑफिसमध्ये तुम्ही विनोदास पात्र ठराल.