कधी आहे सर्वपित्री अमावस्या? ; जाणून घ्या या दिवसाच्या श्राद्धाचं महत्त्व…

वर्षभरात येणाऱ्या सर्व अमावास्यांमध्ये सर्वपित्री अमावास्येला वरचे स्थान असून, याला विशेष महत्त्व आहे. सर्वपित्री अमावास्येला कोणत्या मुहुर्तावर श्राद्ध कार्य करावे? याविषयी महत्त्व जाणून घेऊयात.

  पितृपक्षात पितृलोकांतून सर्व पूर्वज पृथ्वीवर येतात व आपले वंशज आपल्यासाठी काय करतात, हे पाहतात, असा आपल्याकडे समज आहे. पितृपक्षातील अखेरचा दिवस म्हणजे सर्वपित्री अमावास्या. वर्षभरात येणाऱ्या सर्व अमावास्यांमध्ये सर्वपित्री अमावास्येला वरचे स्थान असून, याला विशेष महत्त्व आहे. सर्वपित्री अमावास्येला कोणत्या मुहुर्तावर श्राद्ध कार्य करावे? याविषयी महत्त्व जाणून घेऊयात.

  सर्वपित्री अमावस्येचा शुभ मुहूर्त

  – भाद्रपद अमावास्या प्रारंभ : मंगळवार, ५ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री ०७ वाजून ०५ मिनिटे.

  – भाद्रपद अमावास्या समाप्ती : बुधवार, ६ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ०४ वाजून ३५ मिनिटे.

  – श्राद्ध कार्यासाठी योग्य मुहूर्त : बुधवार, ६ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजून ३६ मिनिटे ते दुपारी १२ वाजून २४ मिनिटे.

  या दिवसाच्या श्राद्धाचं महत्त्व…

  वर्षभरात तसेच पितृपक्षात जे कुणी आपल्या पूर्वजांच्या नावाने श्राद्ध घालू शकले नाहीत, ज्या मृतांची नक्की तिथी माहीत नाही किंवा अनेक कारणांमुळे जे कुणी पूर्वजांच्या नावाने श्राद्ध करू शकलेले नाहीत. ते सर्वजण सर्वपित्री अमावास्येला श्राद्ध कार्य करू शकतात. तसेच पौर्णिमा, अमावास्या आणि चतुर्दशी या तिथींनी निधन झालेल्या पूर्वजांचे श्राद्ध कार्यही सर्वपित्री अमावास्येला करावे. यावेळी कावळा, गाय, श्वान यांना काकबळी काढून ठेवावा, असे सांगितले जाते.