study

वास्तूशास्त्रानुसार(Vastushastra) अशा काही दिशा(Direction) आहेत ज्या दिशेला बसून अभ्यास केल्याने मानसिक तणाव आणि डिप्रेशन वाढू शकते. अशा परिस्थितीत कोणत्या दिशेला बसून अभ्यास करणे(Disrection for study) योग्य आहे हे जाणून घ्यायला हवे.

    तज्ञांच्या मते यशस्वी व्यक्तिमत्वासाठी घर किंवा ऑफिस हे वास्तूशास्त्राच्या (Vastushastra)  दृष्टीकोनातून योग्य असणे आवश्यक आहे. वास्तूशास्त्रानुसार जर वास्तूची (Vastu Tips) रचना असेल तर तुमच्या विकासाला गती मिळते. मुलांच्या अभ्यासाबद्दल बोलायचं तर पालक मुलांच्या अभ्यासासाठी योग्य दिशेची निवड करतात. कारण मुलांच्या स्टडीरूमची चुकीची दिशा(Study room Direction) नकारात्मक ठरते.

    वास्तूशास्त्रानुसार अशा काही दिशा आहेत ज्या दिशेला बसून अभ्यास केल्याने मानसिक तणाव आणि डिप्रेशन वाढू शकते. अशा परिस्थितीत कोणत्या दिशेला बसून अभ्यास करणे योग्य आहे हे जाणून घ्यायला हवे.

    • ध्यान, शांती आणि अभ्यासातील एकाग्रतेसाठी पूर्व,उत्तर किंवा उत्तर -पूर्व दिशा शूभ मानली जाते. या दिशांना सगळ्यात जास्त सकारात्मक प्रभाव असतो.तुमची अभ्यास करण्याची जागा या दिशेला असावी, हे लक्षात ठेवा. स्टडीरुम या दिशेला असावी तसेच अभ्यास करताना चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असावा. ही दिशा मानसिक कार्य, रचनात्मकता आणि अभ्यासासाठी सर्वोत्तम आहे.
    • वास्तूशास्त्रानुसार मुलांच्या खोलीत ठेवलेलं स्टडी टेबल पूर्व किंवा उत्तर दिशेला असावं.
    • फेंगशुई वास्तूशास्त्रानुसार, मुलांच्या स्टडी टेबलवर एज्युकेशनल टॉवर ठेवल्याने त्यांचे अभ्यासात लक्ष लागते.तसेच आकलन शक्ती वाढते.नोकरीसाठी प्रयत्न करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उत्तर दिशा उत्तम आहे. तसेच मुलांच्या अभ्यासासाठी पश्चिम दिशा चांगली आहे.