उन्हाळ्यात कुत्रे जीभ का बाहेर काढतात? जाणून घ्या कारण

जेव्हा बाहेरील तापमान जास्त असते तर आपल्या शरीरात असलेल्या घामाच्या ग्रंथी घाम उत्पन्न करतात आणि शरीरातील घाम वाळतो तेव्हा थंडावा अनुभवतो.

    कुत्रा हा सर्वात जास्त मानसाळलेला प्राणी आहे. आपल्यापैकी अनेकांच्या घरी पाळीव कुत्रा असेल.  आपण बर्‍याचदा पाहिलेच असेल की उन्हाळ्याच्या दिवसात कुत्रे आपली जीभ बाहेर ठेवतात.

    या मागचे कारण म्हणजे जेव्हा बाहेरील तापमान जास्त असते तर आपल्या शरीरात असलेल्या घामाच्या ग्रंथी घाम उत्पन्न करतात आणि शरीरातील घाम वाळतो तेव्हा थंडावा अनुभवतो. कुत्रे हे उष्ण रक्ताचे प्राणी आहेत.

    कुत्र्यांना उष्णता सहन होत नाही, त्यामुळे ते जीभ बाहेर काढून बाष्पीभवनची क्रिया करतात. यामुळे कुत्र्यांना थंडावा मिळतो. हेच कारण आहे की उन्हाळ्यात कुत्रे जीभ बाहेर काढतात.