लोक पॉर्न का पाहतात ? त्याची कारणं काय ? नव्या अभ्यासातून समोर आले ‘हे’ खुलासे

Bothe तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकांच्या पॉर्न (porn) पाहण्याच्या सवयीबाबत एक अभ्यास (study) केला आहे. हा अभ्यास Psychology of Addictive Behaviors या नियतकालिकात प्रसिद्ध झालाय. यामध्ये त्यांनी पॉर्न पाहण्याची नेमकी कारणं काय आहेत ? याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.

  मुंबई : इंटरनेच्या महाजालामुळे तळहाताएवढ्या मोबाईलमध्ये संपूर्ण जग सामावले आहे. मोबाईल तसेच कंप्युटरच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध होत आहेत. यामध्ये विशेष सांगायचे झाले तर इंटरनेटमुळे लोकांना पॉर्नसुद्धा अगदी सहज उपलब्ध झालेय. सध्या लोकांमध्ये पॉर्न (Porn) पाहण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. याच गोष्टीचा विचार करुन पॉर्न पाहण्याचे कारण काय ? तसेच त्याचे प्रमाण किती ? याविषयी संशोधक Bothe आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक अभ्यास केला आहे. याच अभ्यासातून पॉर्न पाहण्यासंबंधी एक नवी माहिती समोर आली आहे.

  Bothe तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकांच्या पॉर्न पाहण्याच्या सवयीबाबत एक अभ्यास केला आहे. हा अभ्यास Psychology of Addictive Behaviors या नियतकालिकात प्रसिद्ध झालाय. यामध्ये त्यांनी पॉर्न पाहण्याची नेमकी कारणं काय आहेत ? याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.

  अभ्यास नेमका कसा केला ?

  पॉर्नविषयी संशोधन करण्यासाठी Bothe तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी हंगेरी देशातील लोकांचे तीन गट तयार केले. यामध्ये पहिल्या सॅम्पलमध्ये एकूण ७७२ लोकांची चौकशी करण्यात आली. यामध्ये ५१ टक्के महिला होत्या. तसेच दुसऱ्या सॅम्पलमध्ये ७९२ लोकांकडून माहिती विचारली गेली. यामध्ये एकूण ६ टक्के महिला होत्या. या सॅम्पलमधील लोक पॉर्न आठवड्यातून दोन वेळा पाहत होते. तर तिसऱ्या सॅम्पलमध्ये एकूण १०८२ लोकांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये सरासरी लोकांचे वय २४ वर्षे होते.

  लैंगिक सुखासाठी ४५ टक्के लोक पॉर्न पाहतात

  Bothe तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या अभ्यासामध्ये अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. यामध्ये विशेष म्हणजे ज्या आठ कारणांचा आधार घेतला आहे, त्या विषयीची आकडेवारी मोठी रंजक आहे. पॉर्न पाहणाऱ्या लोकांमध्ये जवळपास ४५.२ टक्के लोक हे लैंगिक सुख मिळावे म्हणून पॉर्न पहतात. तर लैंगिकतेबद्दलची उत्सुकता म्हणून १२.३ टक्के लोकांनी पॉर्न पाहिले आहे. तसेच कल्पनाविलासापोटी जवळपास ९ टक्के लोक पॉर्न पाहणे पसंद करतात.

  समाधानकारक लैंगिक सुख न मिळणे हेसुद्धा एक कारण

  लैंगिकता, संभोग, पॉर्न तसेच इतर गोष्टींविषयीची माहिती करुन घेण्यासाठी (self-exploration) काही लोक पॉर्न पाहणे पसंद करतात. ही आकडेवारी ६.६ टक्के आहे. तसेच समाधानकर लैंगिक सुख न मिळाल्यामुळेही लोक पॉर्नकडे वळत असल्याचे समोर आले आहे. त्याचे प्रमाण ५.९ टक्के आहे. आलेला कंटाळा, थकवा दूर व्हावा म्हणून अभ्यास केलेल्या लोकांपैकी चार टक्के लोकांना पॉर्न पाहणे आवडत असल्याचे समोर आले आहे. भावनिक दडपण आल्यामुळे २.२ टक्के लोक पॉर्न पाहतात. तसेच तणाव कमी व्हावा म्हणूनसुद्धा २.१ टक्के लोक पॉर्नकडे वळतात. या सर्व कारणांनंतर पॉर्न पाहण्याची इतरही काही कारणे आहेत. ज्याचे प्रमाण ७.३ टक्के आहे.

  दरम्यान, संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार लैंगिक सुख, लैंगिकतेविषयी असलेली जिज्ञासा आणि काल्पनिक जगामध्ये रमण्यासाठी लोकांना पॉर्न पाहणे जास्त प्रमाणात आवडते असे या अभ्यासातून समोर आले आहे.

  Why do people watch porn What is the reason Big revelations proportion from a new study of porn viewing