कॅन्सल चेक का मागितला जातो?; जाणून घ्या कॅन्सल चेकचे महत्व

कॅन्सल चेक देणे म्हणजे तुम्ही ज्या बँकेचा चेक दिला आहे त्यात तुमचे खाते असणे होय. यात खातेदाराचे नाव, शाखेचे नाव आणि पत्ता, खाते क्रमांक आणि MICR क्रमांक असतो. याद्वारे बँकेत तुमचे खाते असल्याची पुष्टी केली जाते.

  ऑनलाईन ट्रान्सझॅक्शनच्या काळात चेकचा वापर अजूनही खूप महत्त्वाचा आहे. चेक अनेकदा इन्शुरन्स, म्युच्युअल फंड आणि इतर अनेक गोष्टींसाठी विचारले जातात. मात्र काय केल्यावर कॅन्सल चेक (Cancelled Check)वैध असेल. तसेच, त्याची मागणी का केली जाते? याबद्दल फारच कमी लोकांना माहिती असते. तुमचे बँकेत खाते आहे हे सिद्ध करण्यासाठी या चेकचा वापर केला जातो असे बँकर्स म्हणतात. यासाठी चेकचे ट्रान्सझॅक्शन सामान्य पद्धतीने केले जात नाही. कॅन्सल चेक एका विशेष प्रकारे चेक म्हणून वापरला जातो.

  कॅन्सल चेक देणे म्हणजे तुम्ही ज्या बँकेचा चेक दिला आहे त्यात तुमचे खाते असणे होय. यात खातेदाराचे नाव, शाखेचे नाव आणि पत्ता, खाते क्रमांक आणि MICR क्रमांक असतो. याद्वारे बँकेत तुमचे खाते असल्याची पुष्टी केली जाते.

  तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, चेकला कॅन्सल चेक तेव्हा म्हणतात जेव्हा चेकवर दोन समांतर रेषा काढल्या जातात आणि त्यांच्या दरम्यान Cancelled असे लिहिले जाते. या चेकद्वारे खात्यातून पैसे काढता येत नाहीत. चेक Cancelled करण्यासाठी, त्यावर फक्त दोन समांतर रेषा काढा आणि त्या दरम्यान ‘ Cancelled’ असे लिहा. Cancelled केलेल्या चेकदवर स्वाक्षरी करण्याची गरज नसते. बँकर्स म्हणतात की, दोन समांतर रेषा काढल्याने तो Cancelled होत नाही. दोन्ही ओळींमध्ये ‘ Cancelled’ लिहिणे आवश्यक असते. याशिवाय चेक Cancelled करण्यासाठी फक्त काळ्या किंवा निळ्या शाईचाच वापर करावा लागेल. इतर कोणत्याही रंगाची शाई स्वीकारली जाणार नाही.

  केव्हा मागतात कॅन्सल चेक ?
  1. इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करताना, इन्शुरन्स कंपनी तुमच्याकडून कॅन्सल चेक मागते.
  2. ऑफलाइन पद्धतीने PF चे पैसे काढताना, तुमचा कॅन्सल चेक विचारला जातो.
  3. याद्वारे हे देखील प्रमाणित केले जाते की, फॉर्म भरलेले बँक खाते तुमचे आहे.
  4. म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करताना इंवेस्टमेंट कंपन्या कॅन्सल चेकची मागणी करतात.
  5. इलेक्ट्रॉनिक क्लिअरन्स सर्विससाठी नोंदणी करताना कॅन्सल चेकदेखील आवश्यक आहे.