Wink Music announces first ever Navratri Nights online concerts
विंक म्युझिकतर्फे पहिल्यावहिल्या 'नवरात्री नाईट्स' ऑनलाइन कॉन्सर्ट्सची घोषणा

भारतात कोविड-१९ विरोधात लढण्यासाठी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळले जात असतील तरी आता यंदा नवरात्रीची मजा घेता येणार नाही ही चिंता आता ग्राहकांना भेडसावणार नाही कारण एअरटेलच्या विंक म्युझिक या भारतातील अव्वल क्रमांकाच्या म्युझिक स्ट्रीमिंग ॲपने आज नवरात्री नाईट्सची घोषणा केली.

  • नऊ दमदार लाईव्ह ऑनलाइन कॉन्सर्ट्ससह आपल्या घरातूनच आरामात संगीतमय नवरात्रीचा आनंद घ्या
  • मिका, किंजल दवे आणि सचिन-जीगर अशा आघाडीच्या कलाकारांचे परफॉर्मन्सेस
  • फक्त २९ रुपयांमध्ये विंक प्रीमिअमचे सबस्क्रिप्शन घ्या आणि नऊ ऑनलाइन कॉन्सर्ट्सचा आनंद मिळवा. एअरटेल थँक्स ग्राहक आणि विंक प्रीमिअम वापरकर्त्यांसाठी मोफत उपलब्ध.
  • १७-२५ ऑक्टोबर या काळात दररोज सायंकाळी ७ ते ८ या वेळेत विंक म्युझीक अॅपवर वापरकर्त्यांना लाईव्ह कॉन्सर्ट्स स्ट्रीम करता येतील

मुंबई: भारतात कोविड-१९ विरोधात लढण्यासाठी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळले जात असतील तरी आता यंदा नवरात्रीची मजा घेता येणार नाही ही चिंता आता ग्राहकांना भेडसावणार नाही कारण एअरटेलच्या विंक म्युझिक या भारतातील अव्वल क्रमांकाच्या म्युझिक स्ट्रीमिंग ॲपने आज नवरात्री नाईट्सची घोषणा केली. अशा प्रकारच्या या पहिल्याच उपक्रमात ऑनलाइन कॉन्सर्ट सीरिजमधून मिका सिंग, किंजल दवे, सचिन-जीगर आणि अशा अनेक आघाडीच्या संगीत कलाकारांचा लाईव्ह परफॉर्मन्स उत्सवाचा आनंद द्विगुणित करणार आहे.

या खास रचण्यात आलेल्या नवरात्री नाईट्स १७-२५ ऑक्टोबर या काळात दररोज लाईव्ह स्ट्रीम करता येतील. दररोज सायंकाळी ७ ते ८ या वेळेत नवरात्री कॉन्सर्टची मजा लाइव्ह अनुभवता येईल आणि संपूर्ण कुटुंबाला आपल्या घरातूनच आरामात गरबा बीट्सवर थिरकता येईल.

विंक स्टेजवर नवरात्री नाईट्सचे आयोजन करण्यात आले आहे. सहजसुंदर लाईव्ह ऑनलाइन कार्यक्रमाचा आनंद एकाच वेळी लाखो वापरकर्त्यांना मिळावा यासाठी आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

वापरकर्त्यांना मॅसेज पोस्ट करता येईल, गाण्यासाठी विनंती पाठवता येईल आणि कलाकारांसोबत रीअल टाईम संवाद साधता येईल. विंक स्टेज कलाकारांसाठीही फायदेशीर आहे. कारण त्यामुळे अधिक व्यापक स्तरावर चाहत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना इथे कोणतेही अडथळे येणार नाहीत.

विंक म्युझिक वरील नवरात्री नाईट्स सर्वांसाठी उपलब्ध आहे, यात एअरटेलचे ग्राहक नसलेल्यांचाही समावेश आहे.

त्यासाठी फक्त विंक म्युझिक डाऊनलोड (आयओएस, अँड्रॉईड) करायचे.

एअरटेल थँक्स आणि विंक म्युझीक प्रीमिअम ग्राहकांना मोफत उपलब्ध

एअरटेल थँक्स आणि एअरटेलचे ग्राहक नसलेल्यांना सर्व ९ कॉन्सर्ट फक्त २९ रुपयांच्या मासिक विंक प्रीमिअममध्ये उपलब्ध होतील

त्याचप्रमाणे, टॅबलेट्स आणि स्मार्टफोन्ससोबतच नवरात्री नाईट्सचा आनंद www.wynkmusic.in इथे वेबच्या (पीसी) माध्यमातूनही घेता येईल.

नवरात्री नाईट्समधील नऊ कॉन्सर्ट्समध्ये दररोज एक लोकप्रिय कलाकार असेल.

१७ ऑक्टोबर शुभारंभाच्या रात्री ‘वॉना बी माय छम्मक छल्लो‘ आणि ‘अनारकली डिस्को चली‘ फेम डीजे खुशी
१८ ऑक्टोबर फेविकॉ से‘ या सुपरहिट गाण्यातील आवाज ममता शर्मा
१९ ऑक्टोबर ओढनी‘ आणि डान्स बसंती‘ सारख्या हिट गाण्यांचे हिंदीगुजराती संगीतकार सचिनजीगर 
२० ऑक्टोबर बलम पिचकारी‘ आणि लत लग गयी‘ सारख्या गाण्यांची लोकप्रिय बॉलिवूड गायिका शाल्मली खोलगडे 
२१ ऑक्टोबर अनेक प्रसिद्ध गुजरातील गाणी देणारा पार्थिव गोहिल
२२ ऑक्टोबर माफिया‘ आणि हम तुम‘ फेम सुकृती आणि प्रकृती कक्कर
२३ ऑक्टोबर लेके पहला पहला प्यारसाठी फिल्मफेअरमध्ये नामांकन मिळवणारी पार्श्वगायिका श्रुती पाठक
२४ ऑक्टोबर चार बंगडी वाली‘ सारख्या अनेक गुजरातील लोकगीतांसाठी प्रचंड लोकप्रिय असलेली किंजल दवे
२५ ऑक्टोबर भांगडा आणि बॉलिवुडमधील सुपरस्टार मिका सिंगसोबत ग्रँड फिनाले