शरद पवार यांनी ट्विटरवर दिल्या शिक्षक दिनाच्या शुभेच्छा

मुंबई : आज ५ सप्टेंबर २०२०. भारताचे पहिले उपराष्ट्रपती, भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (Dr. Sarvapalli Radhakrishnan) यांची आज जयंती(Birth Anniversary). हा दिवस भारतात शिक्षक दिन (#HappyTeachersDay) म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी प्रत्येकजण आपल्या शिक्षकांना(teachers) शुभेच्छा देऊन त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत असतो. या शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) चे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी ट्विट करत सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये देशाची सशक्त पिढी घडवण्यासाठी मार्गदर्शक म्हणून शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. देशाचे जबाबदार नागरिक घडविण्याचे महान कार्य करणाऱ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! भारताचे पहिले उपराष्ट्रपती, भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन असे म्हटले आहे.