woman got hiv positive after one night stand inspirational story vb
महिलेच्या एका 'वन नाइट स्टँड'मुळे आयुष्य लागलं टांगणीला

लाफ्रेचं आयुष्यही अशाच एका वन नाइट स्टँडनंतर पूर्णपणे बदलून गेलं आणि तिचं संपूर्ण आयुष्यचं टांगणीला लागलं. कॉलेजमध्ये असताना मित्रांच्या थट्टा-मस्करीत तिलाही वन नाइट स्टँडची इच्छा झाली आणि इथंच घात झाला असं लाफ्रेने सांगितलं.

एड्स झालाय किंवा एखादा HIV पॉझिटिव्ह असल्याचं ऐकिवात आलं की, लोकांच्या मनात विचारांचं काहूर माजतं आणि विचार करून-करून डोक्याचा पार भुगा होतो. HIV पॉझिटिव्ह ग्रस्त व्यक्तीला लोकं चांगल्या नजरेने पहात नाहीत. रोगापेक्षाही लोकांच्या प्रतिक्रिया ऐकूनच विचार करून ग्रस्त व्यक्ती स्वत:ला अधिक कमजोर समजू लागते. कधीकधी तर अशीही परिस्थिती येते की, भीक नको पण कुत्रं आवर अशी अवस्था होते. लोकांच्या मनातील ही भीती काढून टाकण्यासाठी HIV पॉझिटिव्ह महिलेने तिच्यावर गुदरलेला प्रसंग कथन केला आहे, यामुळे लोकांना दिलासा मिळण्यासोबतच एक शिकवणही मिळते.

अमेरिकेतील कामरिया लाफ्रे HIV ॲडव्होकेट असून स्वत:ही या रोगाने पछाडलेली आहे. लाफ्रे HIV ग्रस्तांच्या हक्कासाठी लढा देते. सोबतच या रोगाप्रती लोकांना जागरुक करण्याचा प्रयत्न करते. कामरिया लफ्रेचा इथवरचा प्रवास खूपच कठीण होता. एका कार्यक्रमात लाफ्रेने सांगितलं की, तिला तिला या रोगाची लागण कशी झाली आणि तिने आपल्या आयुष्याला कशाप्रकारे कलाटणी दिली.

गेल्या काही दशकांत लोकांच्या शारीरिक संबंधांमध्ये खूपच बदल झाले आहेत पण आजही याबाबत लोकांमध्ये काही प्रमाणात अज्ञान असल्याचेच आपल्याला पाहायला मिळते. खासकरून ‘वन नाइट स्टँड’ प्रकरणात खूपच निष्काळजी असल्याचं समोर आलं आहे. लाफ्रेचं आयुष्यही अशाच एका वन नाइट स्टँडनंतर पूर्णपणे बदलून गेलं आणि तिचं संपूर्ण आयुष्यचं टांगणीला लागलं. कॉलेजमध्ये असताना मित्रांच्या थट्टा-मस्करीत तिलाही वन नाइट स्टँडची इच्छा झाली आणि इथंच घात झाला असं लाफ्रेने सांगितलं.

पार्टीत भेटलेल्या एका तरुणासोबत लाफ्रेची ओळख झाली आणि त्यांची फोनाफोनी सुरू झाली आणि बोल असतानाच त्यांनी एक नाइट एकत्र स्पेंड करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी रात्री मद्याचा आस्वाद घेतला आणि कोणतीही काळजी न घेता शरीर संबंध ठेवले. अधिकाधिक तरूण दारू प्यायल्यानंतर संभोग करताना कंडोमचा वापरच करत नाहीत असं एका अभ्यासातून स्पष्ट झालं आहे.

या वन नाइट स्टँडच्या दोन वर्षांनंतर लाफ्रेला प्रेमाचा अनुभव आला आणि तिने एका मुलीला जन्म दिला. मुलीला जन्म दिल्यानंतर रुग्णालयात लाफ्रेने सेक्सुअली ट्रांसमेटेड डिजीज (Sexually transmitted diseases)ची रूटीन टेस्ट करण्यात आली. मुलीला जन्म दिल्यानंतर ती आपल्या रुटीन लाइफमध्ये बिझी झाली.

काही दिवसांनतर डॉक्टरांनी तिला पुन्हा बोलवून घेतलं आणि ती HIV पॉझिटिव्ह असल्याचं तिला सांगितलं. लाफ्रेने आयुष्यात आपल्यासोबत असं काही होईल असा विचार तिच्या मनालाही शिवला नव्हता. बाळाच्या बाबांचा टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर लाफ्रेला कळून चुकलं की, दोन वर्षांपूर्वी तिने जो वन नाइट स्टँड केला होता त्याचीच ही परिणती आहे. कारण तिने याच दोन तरुणांसोबत असुरक्षित शरीर संबंध ठेवले होते.

लाफ्रे म्हणते, मला असं वाटू लागलं की, आता सगळं संपलं, मी लवकरच या जगाचा निरोप घेणार, माझ्यावर आता कोणीही प्रेम करणार नाही आणि मी कधीच नॉर्मल आयुष्य जगूच शकणार नाही. जमेची बाब ही होती की, तिच्या मुलीची टेस्ट निगेटिव्ह आली. ती हा कलंक घेऊन जगू शकत नव्हती आणि तिला तिच्या आई-वडिलांना दुखवायचं नव्हतं असं लाफ्रे सांगत होती. तिच्यासारखेच अन्य जणही आहेत जे HIV विषाणूने पीडित अशून त्यांना स्वत:लाच ही गोष्ट माहिती नाही.

लाफ्रेने मन घट्ट केलं आणि आपल्या मुलीसाठी आयुष्य नव्याने जगायला सुरुवात केली. ती आता लोकांना सेक्सुअल हेल्थबाबत जागरुक करते आणि या रोगासह आत्मसन्मानाने आयुष्य जगण्याचा सल्ला देत आहे. मी माझ्या मुलीला सर्वात आधी स्वत:वर प्रेम करण्याची शिकवण देते आणि इतरांकडून प्रेमाची अपेक्षा कधीच ठेवू नको असं तिला सांगते असं लाफ्रे म्हणते.

लाफ्रे आता आपल्या मुलीच्या वडिलांसोबत राहत नाही. आता तिने एका अशा तरुणासोबत विवाह केला आहे जो तिच्याविषयी सर्वकाही जाणतो आणि तो तिच्यावर आणि तिच्या मुलीवर भरपूर प्रेम करतो. लाफ्रे आता तिच्या आयुष्यात खूप पुढे निघून गेली आहे.

लाफ्रे HIV बाबत जागरुकता निर्माण करण्याचे काम करते आणि आपला स्वानुभव ती अनेक मंचावर इतरांशी शेअर करते. ती तिच्या या कथनाच्या माध्यमातून लोकांमध्ये आत्मसन्मान जागविण्याचा प्रयत्न करते कारण त्यांना या रोगाशी लढण्याची ताकद मिळायला हवी एवढीच तिची प्रामाणिक इच्छा आहे.