Woman in China Ties and Throws Husband into River after He was Caught Cheating
पत्नीला कळलं पतीचं अफेयर, 'त्यांना' बांधून दिलं नदीत ढकलून

ही घटना Maoming शहरात घडली आहे. पहिल्यांदा या आरोपीच्या पतीला त्याच्या अफेयरबाबत कळलं तेव्हा पहिल्यांदा तिने त्याला पिंजऱ्यात बंद केलं होतं. चीनमध्ये सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. टाइम्स नाऊने या घटनेचं वृत्त दिलं आहे.

चीनमधील एका महिलेने आपल्या पतीचे हाथ बांधले आणि त्याला नदीत ढकलून दिलं आहे. तिने असं का केलं? कारण तिचा पती तिच्याशी चीटिंग करत असल्याचं तिच्या निदर्शनास आलं होतं.

पहिल्यांदा केलं होतं पिंजऱ्यात बंद

ही घटना Maoming शहरात घडली आहे. पहिल्यांदा या आरोपीच्या पतीला त्याच्या अफेयरबाबत कळलं तेव्हा पहिल्यांदा तिने त्याला पिंजऱ्यात बंद केलं होतं. चीनमध्ये सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. टाइम्स नाऊने या घटनेचं वृत्त दिलं आहे.

दोघांनाही खुलेआम पकडलं

तथापि, या व्हिडिओत एक जण अर्धा निर्वस्त्र दिसत आहे. पत्नीने आपल्या पतीला दुसऱ्या महिलेसोबत खुलेआम पकडलं होतं पत्नीसोबत अन्य काहीजणही होते त्यांनी तिच्या पतीचे हात बांधले आणि त्याला पिंजऱ्यात बंद केलं. हा पिंजरा बाबूंपासून तयार केलेला होता.

त्यानंतर त्याला दिलं नदीत ढकलून

यानंतर त्याला पिंजऱ्यासह नदीत ढकलून दिलं. त्याला इतरांनी पिंजऱ्याबाहेर काढलं. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे.