महिलांनो वेळीच व्हा सावध अन्यथा मेनोपॉजनंतर (menopause) ऑस्टियोपोरोसिस अर्थात हाडे ठिसूळ होण्याचा धोका

जागरूकतेने शरीर (Body) आणि मनातील बदल (Change of mind) अनुभवायला हवेत. ही सहजता आणि जागरूकता (Spontaneity and awareness) असेल तर मेनोपॉजनंतरच्या (menopause stage) अनेक समस्यांना, आरोग्यविषयक धोक्यांना वेळीच रोखता येते. मेनोपॉजनंतरच्या शारीरिक आणि मानसिक स्तरावरील बदलांना सामोरे जाता येते.

    मेनोपॉजनंतर (menopause) जणू काही आयुष्याला ब्रेक (Break to life) लागला आहे अशा पद्धतीने महिला थबकतात. हबकून जातात. आता झाले वय… यापुढे काय म्हातारपणच असा नकारात्मक विचार करतात. पाळी येणे हे जसे नैसर्गिक असते तितकेच नैसर्गिक असते पाळी (catamenia) जाणे. शरीर आणि संप्रेरकांच्या बदलातून घडणारी मेनोपॉज ही एक नैसर्गिक प्रक्रिया (Natural Process) आहे. तज्ज्ञ (experts) म्हणतात की, या प्रक्रियेकडे सहजपणे पाहायला शिकायला हवे.

    जागरूकतेने शरीर आणि मनातील बदल अनुभवायला हवेत. ही सहजता आणि जागरूकता असेल तर मेनोपॉजनंतरच्या (menopause) अनेक समस्यांना, आरोग्यविषयक धोक्यांना वेळीच रोखता येते. मेनोपॉजनंतरच्या (menopause) शारीरिक आणि मानसिक स्तरावरील बदलांना सामोरे जाता येते. शरीरात कोणतीही मोठी घडामोड झाली की त्याचे चांगले वाईट परिणाम होतातच. काही समस्यांचा धोकाही निर्माण होतो. पण त्याने निराश होण्याचे कारण नाही असे तज्ज्ञ म्हणतात.

    त्यापेक्षा आपल्या सवयीत, जीवनशैलीत त्यानुसार आवश्यक बदल करावेत. मेनोपॉजनंतर (menopause) ज्या अनेक समस्यांचा धोका निर्माण होतो त्यातली एक महत्त्वाची समस्या म्हणजे ऑस्टिपोरोसिस (Osteoporosis) ही आहे. हा एक हाडांसंबधीचा आजार आहे. याबाबत आधीच सावधगिरी बाळगली तर हा धोका कमी होतो. मेनोपॉजमध्ये (menopause) इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या लैंगिक संप्रेरकांचे काम कमी होते. ज्याचा परिणाम महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रेरॉन या संप्रेरकांचं काम मंदावल्यामुळे त्याचा परिणाम हाडांच्या आरोग्यावर होतो.