Work from home has exacerbated the problem of stress among half of working women in India
धक्कादायक! भारतातील निम्म्या नोकरदार महिला तणावात; वर्क फ्रॉम होममुळे वाढली समस्या

  • तज्ज्ञांच्या सर्वेक्षणातून खुलासा

दिल्ली : कोरोनाच्या (corona) संकटामुळे विविध कंपन्यांनी (companies) कर्मचाऱ्यांना (workers) घरूनच काम करण्याचा (Work From Home) सल्ला दिला. यासाठी कंपन्यांकडून काम करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचा (work materials) पुरवठा केला. सुरूवातीला घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले होते. कार्यालयात जाण्याचा वेळ वाचण्यासह प्रवासाच्या खर्चात बचत होत असल्याने कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय पर्वणी ठरला होता. मात्र महिला कर्मचारी (women workers) याला अपवाद असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

वर्क फ्रॉम होममुळे ५० टक्के महिला कर्मचारी तणावात असल्याचे सर्व्हेतून समोर आले आहे. घरातील कामे आणि कार्यालयातील कामे तसेच अवेळी होणाऱ्या अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीमुळे तब्बल १८ तास काम करावे लागत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. पर्यायाने कर्मचारी मानसिक तणाव असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.

वेळेचे नियोजन गडबडले

भारताच्या जवळपास ५० टक्के नोकरदार महिलांना कोरोना महामारीमुळे आधीच्या तुलनेत जास्त तणाव जाणवू लागला आहे. सर्व्हेक्षणानुसार, कोरोनामुळे देशातील नोकरदार महिलांवर भावनिकदृष्ट्या परिणाम होत आहे. सर्व्हेक्षणात समाविष्ट ४७ टक्के महिलांनी सांगितले की, वर्क फ्रॉम होममुळे त्यांना जास्त तणाव तसेच अस्वस्थपणा जाणवत आहे. दुसरीकडे, पुरुषांचा विचार केल्यास त्यांची आकडेवारी थोडी कमी आहे. ३८ टक्के नोकरदार पुरुषांनी सांगितले की, कोरोनामुळे त्यांच्यावरील तणाव वाढला आहे. कार्यालयीन कामातच त्यांचा अधिकतर वेळ जातो. अवेळी कार्यालयातील बैठकीला ऑनलाइन उपस्थित राहावे लागते. वेळेच्या नियोजनाअभावी कर्मचाऱ्यांमध्ये मानसिक तणाव वाढत असल्याचे सर्व्हेक्षणात सांगण्यात आले आहे. हे सर्व्हेक्षण २७ जुलै ते २३ ऑगस्ट दरम्यान करण्यात
आले होते.

मुलांच्या संगोपनासाठी वेळच नाही

१) सर्व्हेक्षणात २२२५४ पुरुष,महिला कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला. यामध्ये देशातील नोकरदार माता आणि नोकरदार महिलांवर कार्यालयातील कामासह मुलांच्या संगोपनाची जबाबदारी आहे. वर्क फ्रॉम होममुळे नोकरदार मातांच्या अडचणी वाढल्या आहेत.

२) सध्या तीनपैकी एक महिला (३१%) पूर्णवेळ मुलांची देखभाल करत आहेत. दुसरीकडे, केवळ पाचपैकी एक म्हणजे १७ टक्के पुरुष संपूर्ण वेळ मुलांची देखभाल करत आहेत. सर्व्हेक्षणात नमूद केले की, पाचपैकी दोन म्हणजे ४४ टक्के महिलांना आपल्या मुलांच्या देखभालीसाठी ठरवून दिलेल्या कामाच्या तासांपेक्षा जास्त काम करावे लागते.

३) फ्री लान्सरच्या रुपात काम करणाऱ्या २५ टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितले की, वर्क फ्रॉम होममुळे उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. २७ टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितले की, त्यांची वैयक्तिक बचत वाढण्याची अपेक्षा आहे. ३१ टक्क्यांनी सांगितले की, येत्या सहा महिन्यादरम्यान आपल्या गुंतवणुकीत वाढीची अपेक्षा आहे.

४) ४६ टक्के महिलांनी सांगितले की, मुले घरी असल्यामुळे कामात लक्ष देऊ शकत नाहीत किंवा जास्त काम करावे लागत आहे. पाचपैकी एक म्हणजे २० टक्के महिला आपल्या मुलांच्या देखभालीसाठी कुटुंबातील सदस्य किंवा मित्रांवर अवलंबून आहेत. पुरुषांच्या प्रकरणात हा आकडा ३२ टक्के आहे.

अशी आहे आकडेवारी

२२२५४ कर्मचारी सर्व्हेक्षणात सहभागी
४७ % महिलांची तणावात असल्याची कबुली
३८ % पुरुषांचा घरुन काम करण्याला विरोध
३१ % महिला कर्मचारी करतात मुलांचा सांभाळ
४४ % कर्मचारी करतात१६-१८ टक्के काम
२५ % कर्मचारी निर्णयासाठी सकारात्मक
३१ % कर्मचाऱ्यांनी दिले आर्थिक बचतीचे कारण