‘या’ देशातील सरकार आता लोकांना ‘सेक्स’ साठी ‘सुट्या’ देत आहे, पंतप्रधान मोदींनी भारतात अशी परवानगी दिली तर…?

आता या घटत्या लोकसंख्येच्या सतावणाऱ्या चिंतेमुळे डेन्मार्क सरकारनेच देशातल्या नागरिकांना अधिकाधिक मुलं जन्माला घालायला सांगितली आहेत. एवढंच नाही आता डेन्मार्क सरकार नव विवाहित जोडप्यांना अतिरिक्त सुट्ट्याही द्यायला सुरुवात केली आहे. या सुट्ट्यांचा फायदा घेत लोकांनी अधिकाधिक सेक्स करावा आणि मुलांना जन्म द्यावा हा सरकारचा यामागचा मानस आहे.

  कोपनहेगन : सगळं जग (World) सद्यस्थितीत कोरोना (Corona)च्या दुसऱ्या लाटेला आणि वाढत्या लोकसंख्येचा सामना करताना हैराण झालंय. एवढंच नाही तर चीन, भारत यासारख्या देशांमध्ये आजही लोकसंख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. याच कारणामुळे या देशाच्या सरकारांना भविष्याशी चिंता लागून राहिली आहे. पण याउलट युरोपच्या डेन्मार्कमध्ये (Denmark) लोकसंख्या सातत्याने घटते आहे.

  अधिकाधिक सेक्स करा आणि मुलं जन्माला घाला, सरकारनेच केलंय आवाहन

  आता या घटत्या लोकसंख्येच्या सतावणाऱ्या चिंतेमुळे डेन्मार्क सरकारनेच देशातल्या नागरिकांना अधिकाधिक मुलं जन्माला घालायला सांगितली आहेत. एवढंच नाही आता डेन्मार्क सरकार नव विवाहित जोडप्यांना अतिरिक्त सुट्ट्याही द्यायला सुरुवात केली आहे. या सुट्ट्यांचा फायदा घेत लोकांनी अधिकाधिक सेक्स करावा आणि मुलांना जन्म द्यावा हा सरकारचा यामागचा मानस आहे.

  सुरु केली आहे ‘Do it for Denmark’ मोहीम :

  एकीकडे सरकारने ही मोहीम सुरू केल्यानंतर आता डेन्मार्कच्या अनेक मोठ्या ट्रॅव्हल कंपन्यांनीही सरकारला साथ देत आपलंही उखळ पांढरं करून घेण्यासाठी कंबर कसली आहे. या कंपन्यांनी जोडप्यांना खास ऑफर्स अंतर्गत त्यांना चांगला वेळ घालविता यावा यासाठी परदेशी पाठविण्यास सुरुवातही केली आहे. ‘स्‍पाइस’ नावाच्या एका ट्रॅव्हल कंपनीने तर लोकांनाही आवाहन केलंय की आपल्या सुना आणि मुलांनाही सुट्टीवर पाठवा जेणेकरून ते लवकरात लवकर आई-बाबा होतील आणि याने सरकारची मदतही होईल.

  डेन्मार्क : बालकांचा जन्मदर सद्यस्थितीत घसरून १.७ %

  उपलब्ध माहितीनुसार डेन्मार्क मध्ये बालकांचा जन्मदर सद्यस्थितीत घसरून १.७ टक्क्यांवर आला आहे. यामुळे आता डेन्मार्क सरकारची चिंता वाढली आहे की, जर वर्तमानात हे प्रमाण असंच घटत राहिलं तर भविष्यात त्यांच्या देशाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात कमी होईल, ज्यामुळे आणखीही काही समस्यांना सामोरे जाण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.