राशी भविष्य दि. १४ डिसेंबर २०२०; ‘या’ राशीच्या लोकांना मोठे फायदे होण्याचा योग

मेष- इच्छेनुसारच काम करा. एखाद्या महत्त्वाच्या कामावरच जास्त लक्ष असेल. एक पाऊल पुढे जाण्याचं नुकसानच होणार आहे. करिअर, नोकरी या विषयांवर महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी सध्याची वेळ चांगली नाही.

वृषभ- नोकरी किंवा करिअरमध्ये बदल करण्याचा विचार कराल. यामुळे तुमची प्रतिमा उंचावेल. मित्रांसमवेत जास्त वेळ व्यतीत कराल. काही मित्र तुमच्या कामात अडथळा म्हणून समोर येतील.

मिथुन- तुम्ही घेतलेले निर्णय योग्य असतील. कामाच्या पद्धतीत काही बदल करण्याची इच्छा होईल. ज्या कामांचा विचार कराल ती पूर्णच कराल. कोणा एका व्यक्तीशी मतभेद होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे अशा गोष्टींपासून आणि व्यक्तींपासून दूरच राहा.

कर्क- ज्या कामांची जबाबदारी तुम्ही घेतली आहे, त्याचा सांगोपांग विचार करा. मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत कराल. काही महत्त्वाची कामं अपूर्ण राहू शकतात.

सिंह- स्थिरता, संरक्षण आणि सहजतेचा अनुभव घ्याल. कामात जास्त वेळ द्यावी लागणार आहे. जबाबदारीने काम करा. सावध राहा. काही कामांमध्ये कपात होईल. अपयशाची भीती असेल. आरोग्याची काळजी घ्या.

कन्या- महत्त्वाची कामं आटोपल्यानंतर मोकळ्या वेळात नीट विचार करा, पुढे जाण्याच्या संधी मिळतील. आज तुम्ही भावनिक विचार जास्त कराल. आजूबाजूच्या व्यक्तींमुळे अडचणीत येऊ शकता.

तुळ- येत्या काही दिवसांमध्ये मोठे फायदे होण्याचा योग आहे. स्वत:साठी वेळ काढा. महत्त्वाच्या कामांवर लक्ष द्या. कोणाशीही उगाचच वाद घालू नका. कामाच्या ठिकाणी एखादा मोठा वाद होऊ शकतो.

वृश्चिक- एकाग्रतेची कमतरचा वारंवार जाणवू शकते. चातुर्य आणि समजुतदारपणे महत्त्वाच्या कामांवर लक्ष द्या. काही महत्त्वाच्या चर्चांमध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. विचारपूर्वकपणे पुढे जा.

धनु- सध्याच्या घडीला तुमच्या हाती असणाऱ्या कामांसाछी जास्त मेहनत करावी लागू शकते. एखाद्या महत्त्वाच्या कामांसाठी योग्य बेत आखावे लागू शकतात. आजचा दिवस तुमच्यासाठी सर्वसामान्य आहे.

मकर- चांगल्या संधी मिळण्याचा योग आहे. धीर बाळगा. नोकरीच्या किंवा इउतर कोणत्या एका ठिकाणी नुकसान होऊ शकतं. ननातील एखादी गोष्ट कोणालाही सांगू नका. नव्या कामाची सुरुवात करु नका.

कुंभ- आज पूर्ण विचार करुनच पुढे जा. पैसे वाचवण्याचा प्रयत्न करा. नवं घर किंवा वाहनाची खरेदी कराल. कामाचा व्याप जास्त असेल. एखादा निर्णय तुमचं नुकसान करणारा ठरु शकतो.

मीन- मित्रपरिवारासोबत चांगला वेळ व्यतीत कराल. जास्तीत जास्त समस्यांवर सहज तोडगा निघेल. एखाद्या वादामध्ये जितके जास्त गुंताल तितकेच जास्त अडचणीत याल.