दिनविशेष : २२ जानेवारी २०२३, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पानिपत, हरियाणा येथे बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेची स्थापना झाली

    २२ जानेवारी घटना

    २०१५: बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेची स्थापना विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पानिपत हरियाणा येथे झाली.
    २००१: आय. एन. एस. मुंबई ही क्षेपणास्त्रवाहू नौका भारतीय नौदलात दाखल झाली.
    १९९९: ऑस्ट्रेलियन धर्मप्रसारक ग्रॅहॅम स्टेन्स व त्याच्या दोन मुलांची ओरिसाच्या केओंझार जिल्ह्यातील मनोहरपूर येथे मोटारीत जाळून हत्या करण्यात आली.
    १९७१: सर्व मित्र सिकरी यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.
    १९६३: डेहराडून येथे अंधांसाठी राष्ट्रीय ग्रंथालय स्थापन केले.
    १९४७: भारतीय घटनेची रूपरेषा कशी असावी याविषयीचा ठराव घटना समितीत मंजूर झाली.
    १९२४: रॅम्से मॅकडोनाल्ड इंग्लंडचे पंतप्रधान बनले. ब्रिटनमध्ये मजूरपक्ष प्रथमच सत्तेवर आला.
    १९०१: राणी व्हिक्टोरियाच्या निधनानंतर ७ वा एडवर्ड हा इंग्लंडचा राजा झाला.

    २२ जानेवारी जन्म

    १९३४: विजय आनंद – हिंदी चित्रपट निर्माते आणि दिगदर्शक (निधन: २३ फेब्रुवारी २००४)
    १९२२: शांता बुध्दिसागर – मराठी लेखिका
    १९२०: प्रा. ह. श्री. शेणोलीकर – संतसाहित्याचे अभ्यासक
    १९१६: सत्येन बोस – बंगाली आणि हिंदी चित्रपट दिगदर्शक आणि पटकथा लेखक (निधन: ९ जून १९९३)
    १९१६: हरीलाल उपाध्याय – गुजराथी लेखक आणि कवी (निधन: १५ जानेवारी १९९४)
    १९११: अनिरुद्ध घनश्याम रेळे – मराठी लेखक
    १९०९: यू. थांट – संयुक्त राष्ट्रांचे तिसरे सरचिटणीस (निधन: २५ नोव्हेंबर १९७४)
    १९०१: निर्मलकुमार बोस – भारतीय मानवशास्रज्ञ
    १८९९: दिलीप कुमार रॉय – हिंदुस्तानी संगीतज्ज्ञ
    १८९६: सुर्यकांत त्रिपाठी उर्फ निशाला – कवी
    १५६१: सर फ्रँन्सिस बेकन – इंग्लिश तत्त्ववेत्ते व मुत्सद्दी (निधन: ९ एप्रिल १६२६)

    २२ जानेवारी निधन

    २०१४: अक्किनेनी नागेश्वर राव – भारतीय अभिनेते आणि निर्माते – पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार (जन्म: २० सप्टेंबर १९२३)
    १९९९: ग्रॅहॅम स्टेन्स – ऑस्ट्रेलियन धर्मप्रसारक
    १९७८: हर्बर्ट सटक्लिफ – इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म: २४ नोव्हेंबर १८९४)
    १९७५: धोंडो वासुदेव गद्रे – केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी काव्यविहारी (जन्म: १६ नोव्हेंबर १८९४)
    १९७३: लिंडन बी. जॉन्सन – अमेरिकेचे ३६ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २७ ऑगस्ट १९०८)
    १९७२: स्वामी रामानंद तीर्थ – भारतीय राजनीतिज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ (जन्म: ३ ऑक्टोबर १९०३)
    १९७१: हॅरी फ्रँक गग्नेहॅम – न्यूज-डेचे सहसंस्थापक (जन्म: २३ ऑगस्ट १८९०)
    १९६७: पांडुरंग सदाशिव खानखोजे – क्रांतिकारक, कृषीतज्ज्ञ (जन्म: ७ नोव्हेंबर १८८४)
    १९२२: बायर फिद्रिक – शांततेचे नोबेल पारितोषिक विजेते
    १९०१: राणी व्हिक्टोरिया – ६३ वर्षे आणि २१६ दिवस इंग्लंडवर राज्य करणाऱ्या राणी (जन्म: २४ मे १८१९)
    १९००: डेव्हिड एडवर्ड ह्यूजेस – मायक्रोफोनचे सहसंशोधक (जन्म: १६ मे १८३१)
    १७९९: होरॅस बेनेडिट्ट डी सास्युरे – ऑस्ट्रीयन उमराव, डॉक्टर आणि आधुनिक गिर्यारोहणशास्त्राचे जनक
    १६८२: समर्थ रामदास स्वामी – भारतीय संत, तत्त्वज्ञ व आध्यात्मिक गुरु
    १६६६: शहाजहान – ५वा मुघल सम्राट (जन्म: ५ जानेवारी १५९२)
    १२९७: चांगदेव – योगी